Poco चा नुकताच लाँच झालेला Poco F4 5G स्मार्टफोनची पहिली सेल होणार आहे. फ्लिपकार्ट या शॉपिंग वेबसाइटवर हा स्मार्टफोन विकला जात आहे. त्यावर, हा स्मार्टफोन 9,000 रुपयांपर्यंत सवलतीत खरेदी केले जाऊ शकतो. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह फोनमध्ये 120Hz डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरे आणि 67W फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये आणण्यात आला आहे. फोनच्या बेस मॉडेल 6GB + 128GB ची किंमत 32,999 रुपये आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 27,999 रुपयांना विकले जात आहे. पण जर तुमच्याकडे SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर तुम्हाला 3,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यासोबतच, 1,000 रुपयांची झटपट सूटही मिळणार आहे. अशा प्रकारे एकूण सूट 9,000 रूपये होते. हा फोन ग्रीन आणि ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Poco F4 5G चे स्पेसिफिकेशन्स
Poco F4 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच लांबीचा फुल- HD + AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 बसवण्यात आला आहे. फोन स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसर द्वारे समर्थित आहे, त्याबरोबरच यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. मात्र, यामध्ये स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो SD कार्ड सपोर्ट उपलब्ध नाही. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड शूटर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटरचा समावेश आहे. सेल्फीसाठी 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. विशेष बाब म्हणजे कंपनी फोनवर 2 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile