Oppo चा 32 हजारांचा जबरदस्त 5G फोन मिळतोय स्वस्तात, वाचा डिटेल्स

HIGHLIGHTS

Oppo F21s Pro 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करा.

19% डिस्काउंटसह हा फोन उपलब्ध

Amazon वर मिळतोय बंपर डिस्काउंट

Oppo चा 32 हजारांचा जबरदस्त 5G फोन मिळतोय स्वस्तात, वाचा डिटेल्स

OPPO कंपनी नेहमी किफायती दरातील स्मार्टफोन्स बाजारात दाखल करत असते. तसेच, या कंपनीचे स्मार्टफोन्सदेखील लोकप्रिय आहेत. जर तुम्हाला Oppo F21s Pro 5G फोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. हा फोन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील उपलब्ध ऑफर्सबद्दल जाणून घ्या.   

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Oppo F21s Pro 5G ची किंमत आणि ऑफर्स 

Amazon वर Oppo F21s Pro 5G उत्तम ऑफर्ससह उपलब्ध आहे. या फोनची MRP 31,999 रूपये आहे. मात्र, 19% डिस्काउंटसह हा फोन 25,999 रुपयांना साईटवर सूचिबद्ध आहे. तसेच, HDFC बँक कार्डने पेमेंट केल्यास 2500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्याबरोबरच, ICICI बँक कार्डने पेमेंट केल्यास देखील 2500 रुपयांचा डिस्काउंट तुम्हाला मिळेल. अशाप्रकारे हा फोन स्वस्तात खरेदी करता येईल. येथून खरेदी करा 

याव्यतिरिक्त, जर तुम्हाला तुमचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज करायचा असेल तर AMAZON तुम्हाला तब्बल 22,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. मात्र, यासाठी तुमचा फोन उत्तम स्थितीत हवा. 

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

या फोनमध्ये 6.43 इंच लांबीचा FHD+ AMOLED पंच होल डिस्प्ले दिला जातो. फोनमध्ये तुम्हाला अल्ट्रा स्लिम रेट्रो डिझाईन मिळेल. OPPO च्या या फोनमध्ये 33W SuperVooc chargerसह 4,500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64MP चा आहे, तर फ्रंट कॅमेरा 16MP चा देण्यात आला आहे.   

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo