150W चार्जिंग असलेला OnePlus फोन 9 हजार रुपयांत स्वस्त, मिळेल उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर

150W चार्जिंग असलेला OnePlus फोन 9 हजार रुपयांत स्वस्त, मिळेल उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर
HIGHLIGHTS

OnePlus 10R 9 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करा

कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह आहे

फोनमध्ये 5000mAh आणि 4500mAh बॅटरी पर्याय आहेत

म्हाला OnePlus स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून, तुम्ही उत्कृष्ट फीचर्ससह एक उत्कृष्ट स्मार्टफोन खरेदी करू शकता. OnePlus 10R 9 हजार रुपयांच्या बंपर सूटसह उपलब्ध आहे. हा फोन तीन प्रकारांमध्ये येतो – 8GB+128GB (80W), 12GB+256GB (80W) आणि 12GB+256GB (150W). फोनची सुरुवातीची किंमत 38,999 रुपये आहे. कंपनी या फोनवर 3,000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देत आहे. याशिवाय, तुम्हाला फोनवर 5 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ICICI कार्डवर 1 हजार रुपयांची झटपट सूट मिळेल. या सर्व ऑफर्स एकत्र केल्यास, फोनवर उपलब्ध असलेली एकूण सूट 9 हजार रुपये होते.

हे सुद्धा वाचा : 'हे' सरकारी ऍप तुमच्यासाठी आहेत खूप महत्त्वाचे, यादीतील शेवटचे ऍप प्रत्येकाच्या फोनमध्ये असायलाचं हवं

OnePlus 10R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

फोनमध्ये, कंपनी 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंच फुल एचडी + 10-बिट AMOLED डिस्प्ले देत आहे. डिस्प्ले 120Hz च्या रीफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह येतो. चांगल्या पिक्चर कॉलिटीसाठी कंपनी या फोनमध्ये HDR10+ सपोर्ट देखील देत आहे. तसेच, डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देखील आहे.

ONEPLUS 10R

हा OnePlus फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.

सेल्फीसाठी तुम्हाला या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये 5000mAh आणि 4500mAh बॅटरी पर्याय आहेत. 5000mAh बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच, कंपनी 4500mAh वेरिएंटमध्ये 150W चार्जिंग देत आहे.

 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo