कमी किमतीत OnePlus चा 5G फोन घ्यायचा असेल तर आज शेवटची संधी आहे. Amazon च्या 5G Revolution सेलचा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये OnePlus चा परवडणारा 5G फोन OnePlus Nord CE 2 Lite 5G अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. तुम्हाला देखील नवीन फोन खरेदी करायचा असेल तर हीच योग्य वेळ आहे.
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus Nord CE 2 Lite 5G ची किंमत
6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या OnePlus Nord CE 2 Lite 5G फोनची MRP 19,999 रुपये आहे. सेलमध्ये, डिस्काउंटनंतर ते 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
ICICI बँक कार्डवरून पेमेंट व्यवहार केल्यास OnePlus Nord CE 2 Lite 5G वर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे. कंपनी या फोनवर 16,850 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे. लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरमध्ये उपलब्ध असलेली अतिरिक्त सवलत तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे. त्याबरोबरच, हा फोन 908 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर खरेदी करण्याचा पर्याय देखील आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G
या फोनमध्ये 6.59-इंच लांबीचा डिस्प्ले देत आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये तुम्हाला 6GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज मिळणार आहे. हा 5G हँडसेट स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो. हा फोन Android 12 वर आधारित Oxygen OS वर काम करतो.
फोनच्या मागील बाजूस LED फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 2MP चा डेप्थ लेन्स आणि 64MP च्या प्रायमरी लेन्ससह 2MP चा मॅक्रो लेन्स समाविष्ट आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देत आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile