OnePlus 12R: फ्लॅगशिप किलर OnePlus ने या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये आपला नवा OnePlus 12R स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला होता. हा स्मार्टफोन कंपनीने मिड बजेट स्मार्टफोन विभागात सादर केला आहे. तुम्ही देखील हा फोन खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, सध्या या फोनवर भारी डिस्काउंट उपलब्ध आहे. होय, Amazon वरून हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला खिशाला जास्त ताण देण्याची गरज नाही. जाणून घेऊयात सवलत आणि सर्व तपशील-
OnePlus 12R फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वरून 39,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Amazon कंपनी OnePlus 12R फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलवर 2000 रुपयांचे डिस्काउंट कूपन देत आहे. त्याबरोबरच, बँक कार्डद्वारे तुम्हाला फोनवर 2000 रुपयांची वेगळी सूट मिळेल. यासह तुम्ही तब्बल 4000 रुपयांची बचत करू शकता.
एवढेच नाही तर, तुम्ही हा फोन EMI सह अगदी सहजरित्या खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, EMI 1,939 रुपयांपासून सुरु होतो. तसेच, यावर नो कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. याशिवाय, एक्सचेंज ऑफरसह फोन खरेदी केल्यास तुम्हाला 30,800 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. येथून खरेदी करा
OnePlus 12R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
#OnePlus 12R चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12R फोनमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. डिस्प्लेमध्ये संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 सपोर्ट आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर, 2MP मॅक्रो सेन्सर आणि 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 5500 बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile