OnePlus लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अलीकडेच लाँच झालेल्या OnePlus 11 5G फोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. ही ऑफर Amazonवर दिली जात आहे, येथून तुम्ही OnePlus 11 5G मोठ्या सवलतीसह तुमचा बनवू शकता. या रिपोर्टमध्ये आज आम्ही तुम्हाला OnePlus 11 5G किती कमी दरात खरेदी करू शकता याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत.
Survey
✅ Thank you for completing the survey!
OnePlus 11 5G ची किंमत
या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत Amazon वर 56,999 रुपये आहे. तुम्हाला ही किंमत जरा जास्त वाटत आहे ना? चला तर मग पूढे फोनवरील उपलब्ध ऑफर्सदेखील बघुयात –
OneCard क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची इन्स्टंट सूट उपलब्ध आहे. त्याबरोबरच, HSBC कॅशबॅक कार्डने पेमेंट केल्यास 5% त्वरित सूट दिली जाईल. ग्राहकांसाठी फोन सहजपणे खरेदी करता यावा म्हणून EMIचा पर्याय देखील आहे. यासाठी तुम्हाला दर महिन्याला 2,723 रुपये द्यावे लागतील.
याशिवाय, स्मार्टफोनवर तब्बल 32,800 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जाईल. जर तुम्ही पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळवण्यास यश मिळवलं तर,फोनची किंमत 24,199 रुपये इतकी होईल.
OnePlus 11 5G
फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा AMOLED QHD डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. हा फोन Android 13 वर आधारित OxygenOS वर काम करतो. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 16 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.
फोनमध्ये पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेल, दुसरा 48 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि तिसरा 32 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे. तर, 16-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देखील उपलब्ध आहे. त्याबरोबरच, फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 100W SUPERVOOC चार्जिंगच्या समर्थनासह येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile