Nothing Phone (2) च्या खरेदीवर तब्बल 20,000 रुपयांची बचत करा, मिळतेय आतापर्यंतची अप्रतिम Discount ऑफर 

HIGHLIGHTS

Nothing Phone (2) वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.

Nothing Phone (2) ट्रान्सपरंट फोन भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांची स्वतंत्र सूट

Nothing Phone (2) च्या खरेदीवर तब्बल 20,000 रुपयांची बचत करा, मिळतेय आतापर्यंतची अप्रतिम Discount ऑफर 

विश्वात सध्या आगामी Nothing Phone (2a) च्या लाँचबाबत चर्चा जोरात सुरु आहेत. आगामी स्मार्टफोन लाँच होण्याआधी Nothing Phone (2) वर जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. हा पारदर्शक दिसणारा फोन Flipkart वरून खरेदी केल्यास तुम्हाला 20,000 रुपयांची सूट मिळेल. हा ट्रान्सपरंट फोन भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात फोनवरील ऑफर्स आणि तपशील-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा: Best Recharge Plans! ‘या’ Airtel प्लॅन्समध्ये Amazon Prime Video, 3GB दैनिक डेटा आणि Unlimited कॉलिंग उपलब्ध

Nothing Phone (2) वरील ऑफर्स

Nothing Phone (2) चे 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट आता Flipkart वरून 18000 रुपयांच्या सवलतीसह 36,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वरून नथिंग फोन (2) खरेदी केल्यावर, तुम्हाला ICICI बँक क्रेडिट कार्डद्वारे 2000 रुपयांची स्वतंत्र सूट देखील मिळेल. या ऑफर्ससह तुम्ही या फोनवर तब्बल 20,000 रुपयांची बचत करू शकता. येथून खरेदी करा

Nothing Phone 2 price cut during Flipkart Sale

Nothing Phone (2) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Phone (2) मध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD+ LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone (2) मध्ये 12GB RAM आणि 256GB आणि 512GB स्टोरेज पर्याय आहेत.

फोटोग्राफीसाठी कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Nothing Phone (2) फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सपोर्टसह 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. त्यासोबतच 50MP चा सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo