लेटेस्ट iQOO 13 मोठ्या Discount सह खरेदीसाठी उपलब्ध, 6000mAh बॅटरीसह Powerful फीचर्स उपलब्ध
iQOO ने अलीकडेच डिसेंबर 2024 मध्ये iQOO 13 फोन भारतीय बाजारात लाँच केला.
iQOO 13 वर Amazon मोठ्या प्रमाणात सवलती देत आहे.
या हँडसेटमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता iQOO ने अलीकडेच डिसेंबर 2024 मध्ये iQOO 13 फोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन आहे, जो महागड्या श्रेणीमध्ये सादर केला गेला आहे. फोनमध्ये अनेक पॉवरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. जर तुम्हाला देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला iQOO 13 वरील ऑफर्सबद्दल माहिती देणार आहोत. पाहुयात ऑफर्स-
SurveyAlso Read: Vodafone Idea New Plans: भरपूर डेटा आणि Unlimited बेनिफिट्ससह नवा प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत

iQOO 13 ची किंमत आणि ऑफर्स
iQOO 13 स्मार्टफोनची किंमत 59,998 रुपये आहे. या किंमतीत 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज उपलब्ध आहे. हा हँडसेट Amazon वरून अप्रतिम सवलतीच्या डील आणि ऑफरसह मिळत आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. तसेच, या हँडसेटवर 2,909 रुपयांचा EMI देखील आहे. याव्यतिरिक्त, हँडसेटवर 22,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळेल. अधिक माहिती आणि खरेदीसाठी क्लिक करा!
iQOO 13 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iQOO 13 मध्ये 6.82 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, iQOO 13 मध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite प्रोसेसर देण्यात आला आहे. यात Android 15 वर काम करणारी Funtouch OS 15 ऑपरेटिंग सिस्टम देखील आहे. याशिवाय, हँडसेटला GLONASS आणि NavIC मिळतात. या हँडसेटमध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे.

फोटोग्राफीसाठी, लेटेस्ट iQOO 13 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony IMX921 लेन्स, 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP Sony IMX 816 लेन्स समाविष्ट आहेत. iQOO 13 स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी यात 32MP फ्रंट कॅमेरा आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, यात फ्लॅशच्या स्वरूपात स्क्रीन स्पॉटलाइट आहे. स्नॅपशॉट, नाईट, पोर्ट्रेट, फोटो, व्हिडीओ, स्लो-मोशन इ. फीचर्स यात उपलब्ध आहेत.
बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, स्मार्टफोनमध्ये मजबूत 6000mAh बॅटरी आहे, जी 120w जलद चार्जिंगसह सुसज्ज आहे. यात एक्सीलरोमीटर, ॲम्बियंट लाइट, प्रॉक्सिमिटी आणि ई-कंपाससारखे सेन्सर आहेत. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी या हँडसेटमध्ये ड्युअल सिम स्लॉट, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-C पोर्ट आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile