प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Itel चा सर्वात स्वस्त 5G फोन Itel P55 5G हा लोकप्रिय बजेट स्मार्टफोन आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Amazon च्या सेलमध्ये हा स्मार्टफोन आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. जर तुम्हाला देखील नवीन आणि स्वस्त 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. यासह फोनसह तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी देखील मिळणार आहे.
Amazon वर Itel फोनची मूळ किंमत 13,499 रुपये आहे. मात्र, 26% च्या डिस्काउंटसह हा स्मार्टफोन 9,999 रुपयांमध्ये सूचीबद्ध आहे. या फोनवर अनेक ऑफर्सदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बँक ऑफर अंतर्गत तुम्हाला निवडक क्रेडिट कार्डवर 999 रुपयांपर्यंतची स्वतंत्र सूट देखील मिळेल. याशिवाय, जर तुमच्याकडे जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंजसाठी असेल तर साईट तुम्हाला 9,450 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील देत आहे. याशिवाय, तुम्ही हा हँडसेट नो कॉस्ट EMI सह देखील खरेदी करू शकता. येथून खरेदी करा
Itel P55 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Itel P55 5G फोन 6.6-इंच लांबीच्या HD+ डिस्प्लेसह येतो, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. तर, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6080 SoC सह सुसज्ज आहे. Mediatek 6080 गेम खेळण्यासाठी एक उत्कृष्ट चिपसेट आहे. स्टोरेज विभागाबद्दल बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे.
ऑप्टिक्ससाठी, या फोनमध्ये AI सेन्सरसह 50MP प्रायमरी शूटर आणि एक सेकंडरी शूटर मिळतो. तर, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. सेल्फीचे शौकीन असलेल्या सर्वांसाठी हा एक उत्तम सेल्फी कॅमेरा ठरतो. तसेच, फोन 5000mAh बॅटरीवर चालेल. सिक्योरिटीसाठी साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो. या स्मार्टफोनमध्ये 5G, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ, GPS आणि चार्जिंगसाठी USB-C पोर्ट समाविष्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile