HIGHLIGHTS
iPhone 14 Plus वर मिळतेय बंपर सूट
फोन फ्लिपकार्टवर सवलतीसह 77,999 रुपयांना सूचिबद्ध
HDFC बँकेच्या कार्डवर थेट 4 हजार रुपयांची सूट
iPhone लव्हर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. iPhone च्या नव्या सीरिजच्या स्मार्टफोनवर तुम्हाला बंपर सूट मिळतेय. iPhone 14 Plus फोन फ्लिपकार्टवर 12 हजार रुपयांच्या सवलतीसह सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 128GB स्टोरेज व्हेरिएंटवर ही सवलत देण्यात येत आहे. जर तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर संपूर्ण लेख नक्की वाचा.
SurveyiPhone 14 सीरीजमध्ये लाँच झालेला iPhone 14 Plus फोन 89 हजार 900 रुपयांच्या किंमतीसह सादर करण्यात आला होता. मात्र, आता हा फोन फ्लिपकार्टवर सवलतीसह 77,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. म्हणजेच आयफोन 14 प्लस 11,901 रुपयांची थेट सवलत दिली जात आहे.
थेट डिस्काउंट व्यतिरिक्त तुमची अधिक बचत देखील होणार आहे. बँक फर्सबद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार केले तर तुम्हाला थेट 4 हजार रुपयांची सूट मिळणार आहे. बँक कार्ड डिस्काउंटसह हा फोन आणखी स्वस्तात मिळेल.
वरील सर्व ऑफर्सनंतर या फोनच्या खरेदीवर तुम्हाला जवळपास 16 हजार रुपयांची सहज मिळणार आहे. एवढेच नाही, तुमच्याकडे जर जुना किंवा विद्यमान फोन एक्सचेंज करण्यासाठी उपलब्ध असेल तर एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरद्वारे तुम्ही फोनवर 29,250 रुपयांची बचत करू शकता. फोनबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी FLIPKART साईटला भेट द्या.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile