नवीन Apple iPhone खरेदी करण्यासाठी ही उत्तम संधी आहे. Amazonवर Amazon मान्सून कार्निव्हल सेल सुरू झाला आहे. हा सेल 7 जून ते 12 जून 2022 पर्यंत चालणार आहे. यादरम्यान तुम्हाला विविध उत्पादनांसह स्मार्टफोन्सवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. या यादीत Apple iPhone 12 चाही समावेश आहे. नवीन iOS 16 अपडेट आल्यापासून, या फोनमध्ये अनेक नवीनतम फीचर्स देखील आले आहेत. सवलत आणि बँक ऑफरनंतर, तुम्हाला iPhone SE 3 च्या बेस व्हेरिएंटच्या जवळपास किंमतीमध्ये iPhone 12 खरेदी करता येईल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
iPhone 12 प्राईस कट
Amazon सेल दरम्यान, iPhone 12 14% डिस्काउंटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोन 64 GB च्या बेस व्हेरिएंटची किंमत 65,900 रुपये आहे, जी Amazon वर 54,900 रुपये इतकी आहे. तुम्हाला एक्सचेंज ऑफरद्वारे त्याची किंमत आणखी कमी करता येईल. येथून खरेदी करा…
स्मार्टफोनवर 9,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट आहे. जर तुमच्याकडे असा स्मार्टफोन असेल जो तुम्हाला एक्सचेंज करायचा असेल तर त्याद्वारे फोनची किंमत 45,400 रुपयांपर्यंत खाली येईल. ही किंमत जवळपास iPhone SE 3 एवढीच आहे, ज्याचे बेस मॉडेल 43,900 रुपयांना विकले जाते.
iPhone 12चे फीचर्स
या फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. तसेच यात सिरेमिक शिल्ड प्रोटेक्शन देखील आहे. प्रोसेसर म्हणून यामध्ये A14 बायोनिक चिप आहे. त्याबरोबरच, यात12MP अल्ट्रा वाइड आणि 12MP वाइड कॅमेर्यांसह ड्युअल-कॅमेरा सिस्टम देखील आहे. इतर फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये नाईट मोडसह 12MP फ्रंट कॅमेरा, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग इ. फीचर्स आहेत. फास्ट वायरलेस चार्जिंगसाठी यात MagSafe ऍक्सेसरीजचे सपोर्ट आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile