त्वरा करा! लोकप्रिय Google Pixel 8 स्मार्टफोनवर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा Discount, बघा सर्वोत्तम डील। Tech News 

त्वरा करा! लोकप्रिय Google Pixel 8 स्मार्टफोनवर मिळतोय तब्बल 10,000 रुपयांचा Discount, बघा सर्वोत्तम डील। Tech News 
HIGHLIGHTS

महागडा Google Pixel 8 प्रचंड सवलतीसह खरेदी करण्याची संधी

Flipkart वर हा फोन 18,000 रुपयांच्या सवलतीसह सूचिबद्ध आहे.

Google Pixel 8 मध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे.

Google चे स्मार्टफोन जरी महागड्या बजेट श्रेणीत येणारे असले तरीही भारतात या कंपनीचे स्मार्टफोन लोकप्रिय आहेत. Google च्या लोकप्रिय सिरीजमधील Google Pixel 8 फोन खरेदी करायचा असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. सध्या हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Flipkart सेल दरम्यान फोनवर थेट 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात फोनची किंमत आणि ऑफर्स-

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Infinix HOT 40i ची भारतात विक्री सुरु, पहिल्या सेलमध्ये मिळतोय मोठा Discount। Tech News

Google Pixel 8 ची किंमत आणि ऑफर्स

Google Pixel 8 फोनचे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 18,000 रुपयांच्या सवलतीसह 75,999 रुपयांना Flipkart सेलमध्ये सूचिबद्ध करण्यात आलेले आहे. फोनवरील उपलब्ध ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Google Pixel 8 फोन Flipkart वर निवडक बँक कार्ड्सद्वारे 10,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या सवलतीसह तुम्हाला हा फोन फक्त 65,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. Buy from here

Google Pixel 8
Google Pixel 8

Google Pixel 8 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Google Pixel 8 मध्ये 6.2-इंच लांबीचा फुल HD+ IPS डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन Tensor G3 प्रोसेसरद्वारे सुसज्ज आहे. या प्रोसेसरसह तुमचा फोन आता अधिक डायनॅमिक इमेजेस, झूम दरम्यान अधिक तपशील कॅप्चर करणे आणि शार्प, हाय कॉलिटीचे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. फोनमध्ये 8GB रॅमसह 128GB आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे.

Google Pixel 8 मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये 50MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच्यासोबत 12MP सेकंडरी कॅमेरा उपलब्ध आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये पॉवरसाठी 4574mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo