आपणा सर्वांनाच माहिती आहे की, Apple iPhones चे चाहते जगभरात पसरलेले आहेत. मात्र, या फोनच्या महागड्या किमतीमुळे प्रत्येकजण iPhone खरेदी करू शकता. त्यामुळे, या स्मार्टफोनवर ऑफर्स येण्याची प्रतीक्षा iPhone लव्हर्स करत असतात. जर तुम्ही देखील नवीन iPhone 15 खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, हीच योग्य वेळ आहे. कारण, Amazon द्वारे हा स्मार्टफोन सवलतीच्या ऑफर विक्रीसाठी उपलब्ध आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात iPhone 15 वरील ऑफर्स-
लेटेस्ट iPhone 15 तुम्ही Amazon वरून मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. iPhone 15 आता Amazon वर 70,900 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनवर बँक कार्डद्वारे 4000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच, त्यावर 3,191 रुपयांचा नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या स्मार्टफोनवर 3000 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
iPhone 15 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
iPhone 15 मध्ये 6.1 इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फीचर आहे, ज्यामध्ये यूजर्स फोन नोटिफिकेशन्स पाहू शकतात. उत्तम परफॉर्मन्ससाठी हा स्मार्टफोन A16 बायोनिक चिपसह सुसज्ज करण्यात आला आहे. iPhone 15 मध्ये 128GB, 256GB आणि 512GB तीन स्टोरेज मॉडेल उपलब्ध आहेत.
कॅमेरा सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, फोटोग्राफीसाठी iPhone 15 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 48MP प्रायमरी कॅमेरा आणि 12MP सेकंडरी कॅमेरा मिळेल. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी iPhone 15 मध्ये 3,349mAh बॅटरी उपलब्ध आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile