64MP कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंगसह येणाऱ्या OnePlus फोनवर प्रचंड Discount, होईल हजारो रुपयांची बचत
नवीनतम नंबर सिरीज OnePlus 13 अलीकडेच भारतात लाँच केली आहे.
सध्या OnePlus 12 वर Amazon मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे.
बँक कार्डद्वारे OnePlus 12 फोन खरेदी केल्यास तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल.
फ्लॅगशिप किलर प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OnePlus ने अलीकडेच आपली नवीनतम नंबर सिरीज OnePlus 13 भारतात लाँच केली आहे. नवीनतम स्मार्टफोन लाँच केल्यानंतर कंपनी पूर्वीचे मॉडेल्स चांगल्या सवलतीसह विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहे. तुम्हाला देखील OnePlus चे महागडे स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करायचे असेल तर, सध्या OnePlus 12 वर Amazon मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OnePlus 12 वरील डील-
Also Read: ऑफर चुकवू नका! लोकप्रिय Vivo V40e 5G वर धमाकेदार Discount, मिळवा तब्बल 9000 रुपयांची सूट
OnePlus 12 ची किंमत आणि ऑफर्स
लोकप्रिय OnePlus 12 फोनच्या 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 61,999 रुपयांना सूचिबद्ध करण्यात आला आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर मोठी बँक कार्ड सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही HDFC आणि ICICI बँक कार्डद्वारे फोन खरेदी केला तर तुम्हाला 4000 रुपयांची सूट मिळेल. यावर तुम्हाला EMI पर्याय देखील मिळेल. तसेच, फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहे. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या किंवा विद्यमान फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. येथून खरेदी करा!
OnePlus 12 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
OnePlus 12 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 6.82-इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 प्रोसेसर उपलब्ध आहे. तसेच, हा फोन अँड्रॉइड 14 आधारित Oxygen OS वर कार्य करतो. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 12GB RAM आणि 16GB RAM चे पर्याय आहेत. तसेच, या स्टोरेजमध्ये 16GB आणि 512G पर्याय देखील उपलब्ध आहेत.
OnePlus 12 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64MP आहे. यामध्ये 50MP चा सेकेंडरी कॅमेरा आणि 48MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर समाविष्ट आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन सिल्की ब्लॅक, फ्लोई एमराल्ड आणि ग्लेशियल व्हाइट कलर ऑप्शन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. पॉवर बॅकअपसाठी, या फोनमध्ये 5400mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर, या फोनमध्ये 50W वायरलेस चार्जिंग देखील उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: या स्टोरीमध्ये एफिलिएट लिंक्स उपलब्ध आहेत.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile