CES 2016 मध्ये लाँच झाले ब्लू विवो 5 आणि विवो XL स्मार्टफोन्स

CES 2016 मध्ये लाँच झाले ब्लू विवो 5 आणि विवो XL स्मार्टफोन्स
HIGHLIGHTS

अमेरिकेची स्मार्टफोन निर्माता कंपनी Blu ने आपले दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स ब्लू विवो 5 आणि विवो XL असे आहेत.

अमेरिकेची स्मार्टफोन निर्माता कंपनीने लास वेगसमध्ये चालू असलेल्या टेक शो CES 2016 मध्ये आपेल दोन नवीन स्मार्टफोन्स ब्लू विवो 5 आणि विवो XL लाँच केले.

 

ह्यातील पहिला स्मार्टफोन ब्लू विवो 5 ची विक्री पुढील महिन्यापासून 199 डॉलर (जवळपास १३,२५० रुपये) पासून सुरु केली जाईल. तर दुसरा स्मार्टफोन विवो XL ची विक्री 149 डॉलर (जवळपास १०,००० रुपये) पासून सुरु होईल. दोन्ही स्मार्टफोन्सला अॅमेझॉन आणि BestBuy.com मधून घेऊ शकता. मात्र आता हा केवळ युएसमध्ये उपलब्ध आहे. मात्र आतापर्यंत कंपनीने इतर देशांमध्ये हा कोणत्या किंमतीत विकला जाईल, ह्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

दोन्ही स्मार्टफोन्सच्या फीचर्समध्ये बरेच साधर्म्य आहे. ब्लू विवो 5 आणि विवो XL स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची सुपर AMOLED डिस्प्ले 720×1280 पिक्सेल रिजोल्युशनसह देण्यात आली आहे. ह्याची पिक्सेल तीव्रता 267ppi आहे. दोघांमध्ये कोर्निंग गोरिला ग्लास 3 ने संरक्षित केले आहे. आणि दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ऑक्टा-कोर मिडियाटेक MT6753 प्रोसेसर दिला गेला आहे आणि दोन्हीही अॅनड्रॉईड 5.1 लॉलीपॉपवर चालतात. असे सांगितले जातय की, हे अॅनड्रॉईड 6.0 मार्शमेलोने अपग्रेड केलेले असतील.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये सर्वात मोठे अंतर हे आहे की, ब्लू विवो 5 मध्ये 3GB ची रॅम आणि 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे. त्याशिवाय दुस-या स्मार्टफोनमध्ये म्हणजेच विवो XL मध्ये 2GB ची रॅमे आणि 16GB चे अंतर्गत स्टोरेज दिले जात आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये हे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.

जर ह्यांच्या कॅमे-याविषयी बोलायचे झाले तर, ह्यात दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ब्लू विवो 5 मध्ये दिल्या गेलेल्या रियर कॅमे-यामध्ये PDAF दिला गेला आहे. दोन्ही स्मार्टफोन्स 4G ला सपोर्ट करतात. आणि दोघांमध्ये आपल्याला USB टाइप-C पोर्ट दिला गेला आहे. ही ह्या दोन्ही स्मार्टफोन्सची सर्वात खास गोष्ट आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 3150mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo