IFA 2018 मध्ये सादर केला जाऊ शकतो BlackBerry Key2 LE स्मार्टफोन

Updated on 27-Aug-2018
HIGHLIGHTS

BlackBerry ची ब्रँड-लाइसेंस कंपनी TCL ने खुलासा केला आहे की Key2 LE बर्लिन मधील IFA मध्ये सादर केला जाईल.

IFA 2018 मध्ये BlackBerry आपला Key2 LE स्मार्टफोन लॉन्च करू शकते, हा स्मार्टफोन Key2 चा छोटा वर्जन असेल. या आधी डिवाइस बद्दल अनेक अफवा समोर आलेल्या आहेत आनि आता BlackBerry ची ब्रँड-लाइसेंस कंपनी TCL ने खुलासा केला आहे की Key2 LE बर्लिन मधील IFA मध्ये सादर केला जाईल. 

अधिकृत लॉन्च च्या आधी BlackBerry KEY2 LE अधिकृत प्रेस रेंडर्स च्या स्वरूपता दिसला आहे. लीक झालेल्या इमेज वरून खुलासा झाला आहे की स्मार्टफोन Key2 सारख्या डिजाइन सह येऊ शकतो आणि याची पॉलीकार्बोनेट टेक्सचर्ड बॅक प्लास्टिक शेल सोबत बदलली जाऊ शकते. Key2 LE मध्ये मेटल फ्रेम ऐवजी प्लास्टिक फ्रेम चा वापर केला जाऊ शकतो. असे बोलेल जात आहे की नवीन स्मार्टफोन अनेक रंगांत सादर केला जाऊ शकतो. 

Key2 LE मध्ये स्नॅपड्रॅगन 636 SoC आणि 4GB रॅम दिला जाऊ शकतो, पण BlackBerry Key2 मध्ये स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट होता. कॅमेरा डिपार्टमेंट ची माहिती समोर आली नाही, पण अनुमान लावला जात आहे की BlackBerry Key2 LE मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल ज्यात 13 आणि 5 मेगापिक्सल चे सेंसर असतील. 

आता पर्यंत आलेल्या रुमर्स वरून माहिती मिळाली आहे की BlackBerry Key2 LE मध्ये आधीच्या Key2 सारखाच कीबोर्ड आहे. हा BlackBerry के DTEK सिक्योरिटी सूट सोबत येईल जो या स्मार्टफोनला खुप सिक्योर एंड्राइड स्मार्टफोन बनवेल. 

BlackBerry KEY2 बद्दल बोलायचे तर यात 4.5 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे आणि सोबत QWERTY कीबोर्ड पण आहे. कंपनी ने फिंगरप्रिंट स्कॅनर स्पेस बार मध्ये एम्बेड केला आहे. यात एक FHD IPS LCD डिस्प्ले आहे ज्याचा एस्पेक्ट रेश्यो (433 PPI ) 3:2 आहे. डिवाइस मध्ये 3500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलजी सोबत येते आणि डिवाइस ला 40 मिनिटांमध्ये 50% चार्ज करू शकते. 

स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 Kryo 260 ओक्टा कोर प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे आणि यात 6GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. त्याचबरोबर डिवाइस ची स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. 
 

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :