17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या OnePlus च्या लेटेस्ट फोनवर पहिल्यांदाच मिळतेय मोठी सूट, बघा ऑफर

17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या OnePlus च्या लेटेस्ट फोनवर पहिल्यांदाच मिळतेय मोठी सूट, बघा ऑफर
HIGHLIGHTS

OnePlus 10R 5G स्मार्टफोन भारी सूट

OnePlus च्या सेलमध्ये फोनवर 9,000 रुपयांपर्यंतची सूट.

स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत होणार फुल चार्ज

OnePlus ने अलीकडेच 17 मिनिटांत पूर्ण चार्ज होणारा OnePlus 10R 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. OnePlus वर सुरू असलेल्या कम्युनिटी सेलमध्ये स्मार्टफोनची विक्री मोठ्या सवलतीत केली जात आहे. स्मार्टफोनच्या सर्वात मोठ्या फीचर्समध्ये 150W SuperWook फास्ट चार्जिंग सपोर्ट, MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट आणि 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप यांचा समावेश आहे. OnePlus च्या सेलमध्ये तुम्हाला 9000 रुपयांपेक्षा जास्त सूटवर 10R 5G खरेदी करता येईल. चला तर जाणून घेऊयात या फोनशी संबंधित सर्व ऑफर्स आणि डील्सबद्दल… 

OnePlus 10R 5G स्मार्टफोनवरील ऑफर्स

OnePlus 10R 5G ला जबरदस्त सवलतीत खरेदी करण्यासाठी तुम्ही OnePlus Store मधून हा फोन खरेदी करू शकता. हा फोन सध्या 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. OnePlus कम्युनिटी सेलमध्ये, तुम्हाला या फोनवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड, EMI वर 4,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.

जर तुम्ही हा फोन Amazon वरून खरेदी केला तर तुम्हाला जुन्या फोनच्या एक्सचेंजवर 13,050 रुपयांची सूट मिळेल. एवढेच नाही, तर तुम्हाला 1,836 रुपयांच्या EMI सह स्मार्टफोन खरेदी करता येईल.

हे सुद्धा वाचा: रिलायन्स Jioचा 'हा' रिचार्ज प्लॅन महागला, ग्राहकांना मोजावे लागणार आता जास्त पैसे

OnePlus 10R 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 10R 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा फुल-HD + AMOLED डिस्प्ले आहे. जो 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट, तसेच 720Hz टच रिस्पॉन्स रेट देखील देतो, त्याबरोबरच, डिस्प्ले 2.5D वक्र कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 द्वारे प्रोटेक्टेड आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 8100-Max SoC मिळतो, जो 12GB पर्यंत LPDDR5 RAM सह जोडलेला आहे.

OnePlus 10R 5G SoC हे MediaTek Dimensity 8100-Max आहे. चिपसेट 3D पॅसिव्ह कूलिंग टेक्नॉलॉजीसह जोडलेले आहे, जे फोनचे तापमान नियंत्रित करते. OnePlus 10R 5G फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह येतो. 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, अल्ट्रा-वाइड लेन्ससह 8-मेगापिक्सेलचा सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो शूटर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी समोर 16-मेगापिक्सेलचा सेन्सर आहे.

OnePlus 10R 5G Endurance Edition मॉडेल 150W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4500mAh बॅटरीसह येतो. कंपनीचा दावा आहे की, हा फोन फक्त 17 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo