आसूस लाइव स्मार्टफोन लाँच

आसूस लाइव स्मार्टफोन लाँच
HIGHLIGHTS

हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6580 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

मोबाईल निर्माता कंपनी आसूसने आपला नवीन स्मार्टफोन लाइव लाँच केला आहे. सध्यातरी ह्या स्मार्टफोनला ब्राझीलमध्ये लाँच केले गेले आहे. ह्या स्मार्टफोनची किंमत २१० डॉलर (जवळपास १४,००० रुपये) ठेवण्यात आली आहे.

 

आसूस लाइव खरेदी करणा-या यूजरला २ वर्षांसाठी 100GB चा गुगल ड्राइव स्टोरेज मोफत मिळेल. त्याशिवाय 5GB चे आसूस वेबस्टोरेजसुद्धा मिळत आहे.

आसूस लाइव स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ५ इंचाची HD डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन 720×1280 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.3GHz क्वाड-कोर मिडियाटेक MT6580 प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो.

त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. ह्यात 2070mAh ची बॅटरी दिली गेली आहे. हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर काम करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात 3G, वायफाय 802.11 B/G/N, USB 2.0, ब्लूटुथ V4.0, FM रेडियो आणि GPS फीचर्ससुद्धा आहे. ह्याचे परिमाण 144.5x71x9.98mm आणि १४० ग्रॅम वजन आहे. हा स्मार्टफोन ब्लू, मजेंटा आणि पिवळ्या रंगात उपलब्ध आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo