ह्या स्मार्टफोनमध्ये २ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2100mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
मोबाईल निर्माता कंपनी अॅक्वाने आपला नवीन बजेट स्मार्टफोन 3G 512 बाजारात आणला आहे. कंपनीने ह्या स्मार्टफोनची किंमत २,६९९ रुपये ठेवली आहे. हा स्मार्टफोन ऑनलाईन वेबसाइट्सवर उपलब्ध होईल.
Survey
✅ Thank you for completing the survey!
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 4 इंचाची WVGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 480×800 पिक्सेल आहे. हा स्मार्टफोन 1.2GHz ड्यूल-कोर (कॉर्टेक्स-A7) मिडियाटेक MTK6572 प्रोसेसर आणि 512MB रॅमने सुसज्ज आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 4GB चे अंतर्गत स्टोरेज दिले गेले आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला गेला आहे. ह्या स्मार्टफोनमध्ये 2100mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
ह्या स्मार्टफोनमध्ये 3G, वायफाय, ब्लूटुथ, मायक्रो-USB, एक्सलेरोमीटर, प्रॉक्सिमिटी आणि एंबियट लाइट सेंसरचा सुद्धा समावेश केला आहे. अॅक्वा 3G 512 चे परिमाण 115×61.5×9.7mm आहे. आणि ह्याचे वजन 113 ग्रॅम आहे.
हा स्मार्टफोन ईबोनी ब्लॅक आणि पर्ल व्हाइट रंगात उपलब्ध होईल. अॅक्वा 3G 512 स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअॅप, वायबर, यूट्युब आणि फेसबुकसारखे अनेक अॅप आधीच इन्स्टॉल असतील.