Apple Store Diwali Offer : iPhone खरेदीवर मिळवा 7 हजार रुपयांची सूट, वाचा सविस्तर

Apple Store Diwali Offer : iPhone खरेदीवर मिळवा 7 हजार रुपयांची सूट, वाचा सविस्तर
HIGHLIGHTS

Apple Store Diwali Offer सुरु

लाभ फक्त 41,900 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रोडक्ट्सवर मिळेल

अलीकडेच लाँच झालेल्या Apple प्रोडक्ट्सच्या किमती बघा

Apple ने ई-कॉमर्स वेबसाइट ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या फेस्टिव्ह सेल दरम्यान एक मोठी भेट दिली आहे. ऍप्पलने आता आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी ऑफर Apple Store Diwali Offer सेल आणला आहे. ऍप्पलचा हा सेल 26 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये HDFC बँक आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर 7,000 रुपयांपर्यंतची झटपट सूट दिली जाईल. ऑफर अंतर्गत, लाभ फक्त 41,900 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रोडक्ट्सवर मिळू शकतो. मात्र, ही ऑफर निवडक ऍप्पल ग्राहकांसाठी आहे.

हे सुद्धा वाचा : Cheapest Recharge : 'हे' आहेत सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन, किंमत 26 रुपयांपासून सुरू

अलीकडेच लाँच झालेले Apple प्रोडक्ट्स 

या महिन्यात 7 सप्टेंबर रोजी Apple ने iPhone 14 सिरीज, Apple Watch 8 आणि AirPods Pro 2 लाँच केले. भारतात iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे. तर, iPhone 14 Plus ची प्रारंभिक किंमत 89,900 रुपये आहे. iPhone 14 Pro ची प्रारंभिक किंमत रुपये 1,29,900 आणि iPhone 14 Pro Max ची प्रारंभिक किंमत रुपये 1,39,900 आहे. Apple Watch Series 8 ची सुरुवातीची किंमत 45,900 रुपये आहे आणि Apple Watch SE ची सुरुवातीची किंमत 29,900 रुपये आहे, तर Apple Watch Ultra 89,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल. या सर्व लेटेस्ट प्रोडक्ट्सवर देखील ऑफर मिळण्याची शक्यता आहे.

apple iphone 14

ऑफर : 

Apple च्या Apple Store दिवाळी ऑफरमध्ये, क्रेडिट कार्डवर 7 टक्क्यांपर्यंत झटपट सूट दिली जाईल. केवळ HDFC बँक आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ग्राहकांना त्वरित सवलतीचा लाभ मिळेल. तसेच, ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहक किमान 41,900 रुपयांमध्ये एकाच वेळी दोन प्रोडक्ट्स खरेदी करू शकतात.

Apple च्या iPhones, MacBooks, iPads आणि AirPods च्या खरेदीवर या ऑफरचा लाभ घेता येईल. Apple चा नवीन iPhone 14 या ऑफर अंतर्गत 72,900 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो, त्याची किंमत 79,900 रुपये आहे. Apple Store दिवाळी ऑफरमध्ये 7% झटपट कॅशबॅक म्हणजेच जास्तीत जास्त 7000 रुपये सर्व iPhones वर उपलब्ध असेल. इतकेच नाही तर ग्राहकांना 3 ते 6 महिन्यांचा नो-कॉस्ट EMI आणि ऑफर अंतर्गत जुने फोन एक्सचेंज करण्याची सुविधा देखील मिळत आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo