Exciting: लक्ष द्या! Amazonच्या आगामी GIF सेलमध्ये iPhone 13 वरील डील जाहीर, वाचा संपूर्ण डिटेल्स। Tech News 

Exciting: लक्ष द्या! Amazonच्या आगामी GIF सेलमध्ये iPhone 13 वरील डील जाहीर, वाचा संपूर्ण डिटेल्स। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी सेल सुरु होण्याआधी Amazon ने एक बेस्ट डील जाहीर केली आहे.

Amazon Great Indian Festival Sale मध्ये iPhone 13 ऑफर्सचा वर्षाव होणार आहे.

बँक ऑफरमध्ये SBI बँक कार्डने व्यवहार केल्यास 2,500 रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठं फेस्टिवल अवघ्या काही दिवसांत सुरु होणार आहे. होय, आम्ही Amazon च्या आगामी GIF म्हणजेच Great Indian Festival Sale बद्दल बोलत आहोत. हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची तारीख जाहीर झाल्यानंतर, Amazon ने एक बेस्ट डील जाहीर केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, Great Indian Festival Sale मध्ये Apple iPhone 13 फोनवर मिळणार असलेली डील उघ करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा लोकप्रिय iPhone 39,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Apple iPhone 13 वरील डील

वर सांगितल्याप्रमाणे, Amazon Great Indian Festival Sale मध्ये iPhone 13 ऑफर्सचा वर्षाव होणार आहे. Amazon ने एक मोठी डील जाहीर केली आहे, हा फोन तुम्हाला केवळ 39,999 रुपयांच्या ऑफर किंमतीवर स्वतःचा बनवता येईल. या GIF सेलमध्ये, MRP 59,900 रुपयांचा iPhone 13 डील प्राईसवर 45,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

एवढेच नाही आता फोनवर उपलब्ध इतर ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, बँक ऑफरमध्ये SBI बँक कार्डने व्यवहार केल्यास 2,500 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. त्याबरोबरच, एक्सचेंजवर 3,500 रुपयांचा एक्सट्रा ऑफ देखील मिळणार आहे. खाली दिलेल्या टीझर पेजवरून, iPhone 13 वर ऑफर केल्या जाणार्‍या सवलतीचे तपशील स्पष्टपणे समोर आले आहेत. तुम्ही येथे देखील ऑफर चेक करू शकता.

Apple iPhone 13

iPhone 13 फोनमध्ये 6.1-इंच लांबीचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. डिस्प्ले जबरदस्त व्हिज्युअल वितरीत करू शकतो. त्याबोरबच, फोन A15 बायोनिक चिपसह येतो. फोनला पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी, iPhone 13 मध्ये मागे 12MP + 12MP ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्याबरोबरच, फ्रंटला 12MP सेल्फी कॅमेरा सिस्टम आहे. या फोनमध्ये दिलेल्या सिनेमॅटिक मोडद्वारे शूट करताना त्या व्हिडिओंमध्ये ऑटो फोकस बदलतो. फोन कॅमेरासह 60fps वर 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. यासह तुम्हाला जबरदस्त फोटोग्राफीचा अनुभव मिळणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo