Nokia PureBook : नोकियाने एकाच वेळी लाँच केले तीन लॅपटॉप, 360 डिग्री रोटेटसह मिळेल बरेच काही

Nokia PureBook : नोकियाने एकाच वेळी लाँच केले तीन लॅपटॉप, 360 डिग्री रोटेटसह मिळेल बरेच काही
HIGHLIGHTS

Nokia PureBook तीन लॅपटॉप्स एकाच वेळी लाँच

नोकियाने या लॅपटॉप सीरिजची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही.

लॅपटॉप लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होण्याची शक्यता

स्मार्टफोन ब्रँड Nokia ने आपला नवा लॅपटॉप Nokia PureBook सिरीज लाँच केला आहे. ही लॅपटॉप सिरीज IFA 2022 मध्ये सादर करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत, PureBook Fold, PureBook Lite आणि PureBook Pro 15.6 (2022) लाँच करण्यात आले आहेत. प्युअरबुक फोल्ड लॅपटॉपमध्ये 14.1-इंच लांबीचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे, जो 360 डिग्रीपर्यंत रोटेट होऊ शकतो. Nokia PureBook Fold आणि PureBook Lite लॅपटॉपला Intel Pentium Silver N6000 प्रोसेसर मिळतो, जो 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह येतो. तर Intel Core i3 प्रोसेसर PureBook Pro 15.6 मध्ये देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : Amazon Great Indian Festival चा टीझर समोर आला आहे, 'या' iPhone मॉडेल्सवर मिळेल आकर्षक सूट

Nokia PureBook Fold आणि PureBook Lite चे स्पेसिफिकेशन 

हे दोन्ही लॅपटॉप 14.1-इंच लांबीच्या फुल HD प्लस IPS LCD डिस्प्लेसह सादर केले गेले आहेत, ज्याला 1,080×1,920 पिक्सेल रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 250 nits ब्राइटनेस मिळतो. Nokia PureBook Fold देखील 360 डिग्री पर्यंत फिरवता येतो. दोन्ही लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम सिल्व्हर N6000 प्रोसेसर आहे, जो 8 GB LPDDR4x रॅम आणि 128 GB eMMC स्टोरेजसह येतो.

लॅपटॉपवरील कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये दोन USB टाइप-C पोर्ट 3.2, USB टाइप-A पोर्ट 3.0, 3.5 मिमी जॅक आणि मायक्रो SD कार्ड स्लॉट समाविष्ट आहे. लॅपटॉपमध्ये Wi-Fi 5 आणि Bluetooth v5 देखील समर्थित आहेत. तसेच, लॅपटॉपमध्ये ड्युअल स्पीकर आणि 1 मेगापिक्सेल वेबकॅम उपलब्ध आहे. लॅपटॉप 38Whr बॅटरी आणि 45W चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

Nokia PureBook Pro 15.6 (2022) चे स्पेसिफिकेशन्स

लॅपटॉपमध्ये 1,080×1,920 पिक्सेल रिझोल्यूशन, 60Hz रिफ्रेश रेट आणि 250 nits ब्राइटनेससह 15.6-इंच लांबीचा फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये Intel Core i3-1220P प्रोसेसर आणि 8 GB DDR4 RAM आणि 512 GB SSD स्टोरेज आहे. लॅपटॉपमध्ये 2 मेगापिक्सेल वेबकॅम आणि ड्युअल स्पीकर सपोर्ट आहे. लॅपटॉपमध्ये 57Whr बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे. यामध्ये देखील Nokia PureBook Fold प्रमाणे सर्व कनेक्टिव्हिटी पोर्ट उपलब्ध आहेत.

Nokia PureBook series किंमत

Nokia PureBook Fold आणि PureBook Lite ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध केले जातील.  PureBook Pro 15.6 (2022) ब्लू, डार्क सिल्व्हर, रेड आणि सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. नोकियाने या लॅपटॉप सीरिजची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. लवकरच तो भारतीय बाजारपेठेतही लॉन्च केला जाऊ शकतो.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo