हा लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. लेनोवोने भारतात ह्या लॅपटॉपची किंमत १४,९९९ रुपये ठेवली आहे. ग्राहक ह्या लॅपटॉपला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिल खरेदी करु शकता.
लेनोवोने भारतीय बाजारात एक स्वस्त असा लॅपटॉप आयडियापॅड 100S लाँच केला आहे. लेनोवोने भारतात ह्या लॅपटॉपची किंमत १४,९९९ रुपये ठेवली आहे. ग्राहक ह्या लॅपटॉपला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिल खरेदी करु शकता.
ह्या लॅपटॉपची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. लेनोवो आयडियापॅड 100S लॅपटॉपमध्ये 1.83GHz क्वाड-कोर इंटेल एटम Z3735F प्रोसेसर आणि 2GB रॅम दिले गेले आहे. ह्या फोनमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले गेेल आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डने वाढवू शकतो.
ह्या लॅपटॉपमध्ये 11.6 इंचाची HD TN डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. ह्या लॅपटॉपमध्ये ग्राफिक्ससाठी इंटल HD दिला गेला आहे. लॅपटॉपमध्ये 0.3 मेगापिक्सेलचा वेबकॅम आहे आणि स्टँडर्ड कीबोर्डसुद्धा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या लॅपटॉपमध्ये ब्लूटुथ V4.0, वायफाय 802.11 B/G/N,दोन USB 2.0 पोर्ट, HDMI पोर्ट सारखे फीचर्स दिले गेले आहेत. कंपनीचा दावा आहे की, ह्याची बॅटरी ८ तासांचा बॅटरी बॅकअप देते. ह्याचे वजन १ किलोग्रॅम आणि परिमाण 292x202x17.5mm आहे. ह्याचा सिल्व्हर रंगाचा वेरियंट बाजारात उपलब्ध होईल आणि त्याचबरोबर कंपनी ह्यावर १ वर्षाची वॉरंटीसुद्धा देत आहे.