तुम्ही लॅपटॉप वापरता का ? ‘हे’ शॉर्टकट तुमचे काम करतील अधिक सोपे, जाणून घ्या कसे…

तुम्ही लॅपटॉप वापरता का ? ‘हे’ शॉर्टकट तुमचे काम करतील अधिक सोपे, जाणून घ्या कसे…
HIGHLIGHTS

लॅपटॉपवर काम करत असलेल्या लोकांसाठी उपयुक्त माहिती

काही शॉर्टकट्स तुमचा बराच वेळ वाचवतील

जाणून घ्या, तुमच्यासाठी उपयुक्त अशा शॉर्टकट की

आजकाल लॅपटॉपचा वापर कार्यालयीन कामकाज, इंटरनेट ब्राउझिंग तसेच ऑनलाइन अभ्यास आणि सोशल मीडिया स्क्रोलिंगसाठी केला जात आहे. अशा परिस्थितीत लॅपटॉपचा कीबोर्ड नीट जाणून घेतल्यास तुमच्या वेळेची बचत होणार आहे. कीबोर्ड शॉर्टकटच्या मदतीने तुम्हाला लॅपटॉपवरील काम सोपे आणि गमतीशीरपणे करता येईल. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लॅपटॉपच्या या अप्रतिम शॉर्टकटबद्दल सांगणार आहोत. 

हे सुद्धा वाचा : Pebble चे नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, मिळेल मोठा 1.85-इंच लांबीचा डिस्प्ले आणि बरेच काही

Window + alt + R

विंडोजसोबत येणाऱ्या उत्कृष्ट शॉर्टकटपैकी हा एक आहे. या शॉर्टकटच्या मदतीने लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करता येते. या शॉर्टकट की एकाच वेळी प्रेस केल्यानंतर, तुमच्या लॅपटॉपचे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होईल. तुम्हाला तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन रेकॉर्ड करायची असल्यास, स्क्रीन रेकॉर्डिंगसाठी तुम्हाला एकाच वेळी Window  + Alt + R बटणे दाबावी लागतील. यानंतर तुमच्या लॅपटॉपचे स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होईल.

Window + D

या शॉर्टकट कीच्या मदतीने लॅपटॉपमध्ये चालणारी विंडोज एकाच वेळी मिनिमाइज करता येते. जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक विंडो उघडून काम करत असाल आणि तुम्हाला होम स्क्रीनवर स्विच करायाचे असेल, तेव्हा हा शॉर्टकट सर्वात उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला सर्व विंडो एक-एक करून मिनिमाइझ कराव्या लागतील, परंतु तुम्ही Window + D शॉर्टकटने तेच करू शकता. तुम्हाला फक्त Window + D प्रेस करायची आहे आणि तुमच्या विंडोजमध्ये उघडलेल्या सर्व विंडो एकत्रितपणे मिनिमाइज होतील. तुम्ही Window + D च्या ऐवजी Window + M देखील वापरू शकता.

Window + L

सुरक्षिततेच्या दृष्टीने ही अतिशय उपयुक्त शॉर्टकट की आहे. त्याच्या मदतीने सिस्टम लॉक केली जाऊ शकते. म्हणजेच, तुमचा पीसी तुमच्या पासवर्डने पुन्हा उघडेल. या फीचरचा सर्वाधिक फायदा म्हणजे जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी बाहेर जावे लागते, तेव्हा अशा परिस्थितीत तुम्ही Window + L शॉर्टकट की वापरू शकता. 

Shift + Ctrl + T

हा शॉर्टकट गुगल क्रोमसाठी सर्वात उपयुक्त शॉर्टकट आहे. त्याच्या मदतीने, हटवलेले टॅब देखील परत आणले जाऊ शकतात. काही वेळा आपण घाईघाईने आवश्यक असलेले टॅबही क्लोज करतो, मग त्या लिंकवर जाण्यासाठी हिस्ट्रीची मदत घ्यावी लागते. तुम्ही हे Shift + Ctrl + T शॉर्टकट की वापरून देखील करू शकता.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo