4K OLED डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह HP चे नवीन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत

4K OLED डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंगसह HP चे नवीन लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

HP ने भारतात दोन नवीन लॅपटॉप लाँच केले

लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.30 लाख रुपये

30 मिनिटांत लॅपटॉपला 50% पर्यंत चार्ज करणारी बॅटरी

HP ने आपले नवीन लॅपटॉप Specter x360 16 (2022) आणि x360 13.5 भारतात लाँच केले आहेत. कंपनीचे नवीन लॅपटॉप 2 इन 1 कन्व्हर्टिबल डिझाइनसह येतात. यामध्ये Intel Arc Graphics सोबत 12th Gen Intel Core प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉपच्या 16-इंच मॉडेलची किंमत 1.4 लाख रुपये आहे. तर, लॅपटॉपच्या 13.5-इंच साईजसाठी, तुम्हाला 1.3 लाख रुपये खर्च करावे लागतील. नवीन लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून प्री-बुक करता येईल.

हे सुद्धा वाचा :  Realme C35 स्मार्टफोनमध्ये नवीन सिस्टम अपडेट जारी, बग फिक्स आणि सिक्युरिटी पॅच देखील समाविष्ट

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

कंपनी या दोन्ही लॅपटॉपवर टचस्क्रीनसह 4K OLED डिस्प्ले देत आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. लॅपटॉपची खास गोष्ट म्हणजे यामध्ये पिंच-टू-झूम आणि डबल टॅपसह प्रेस अँड होल्ड टू ड्रॉ स्केच यांसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये, तुम्हाला बॅकलिट कीबोर्ड आणि मोठ्या ट्रॅकपॅडसह टॉप बेझलमध्ये वेबकॅम देखील पाहायला मिळेल. लॅपटॉपमध्ये कंपनी 12व्या जनरेशनचा इंटेल कोर i7 प्रोसेसर देत आहे. 

बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही लॅपटॉपमध्ये खूप पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 16 तास चालते. लॅपटॉपमध्ये दिलेली बॅटरी फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते, जी 30 मिनिटांत लॅपटॉपला 50% पर्यंत चार्ज करते. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये मायक्रो SD कार्ड रीडर व्यतिरिक्त HDMI पोर्ट, टाइप A पोर्ट, टाइप-C पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo