Dell XPS 13: सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हलका लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Dell XPS 13: सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हलका लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
HIGHLIGHTS

Dell XPS 13 9315 लॅपटॉप भारतात लाँच

सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हलका लॅपटॉप

लॅपटॉप 80 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल, असा कंपनीचा दावा

लोकप्रिय लॅपटॉप ब्रँड Dell ने आपले प्रोडक्ट Dell XPS 13 9315 लॅपटॉप भारतात लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हा त्यांच्या सेगमेंटमधील सर्वात स्लिम आणि हलका XPS लॅपटॉप आहे. यामध्ये 12th Gen Intel Evo प्रोसेसर आणि लॉंग बॅटरी लाईफ देखील मिळते. तसेच, लॅपटॉप फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. लॅपटॉपमध्ये इंटेल i7 प्रोसेसरसह 512 GB पर्यंत स्टोरेज आणि 16 GB पर्यंत RAM आहे. हा लॅपटॉप 13.99mm स्लिम डिझाइनसह येतो आणि त्याचे वजन 1.7kg आहे. 

हे सुद्धा वाचा : जबरदस्त कॅमेरा फ्लॅश आणि बॅटरीसह Vivo V25 Pro आज भारतात होणार लाँच, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Dell XPS 13 9315

हा लॅपटॉप विंडोज 11 प्रो सह येतो. यात 13.4-इंच लांबीचा फुल HD+ इन्फिनिटी अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे, जो 1,920×1,200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 500 ​​nits ब्राइटनेससह येतो. Dell XPS 13 9315 मध्ये 12th Gen Intel Evo 1250U प्रोसेसर आणि Intel Iris Xe ग्राफिक्ससाठी सपोर्ट आहे.

लॅपटॉपमध्ये 16 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512 GB पर्यंत PCIe NVMe x2 SSD स्टोरेज आहे. सिक्योरिटीसाठी लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट रीडर आहे. लॅपटॉपमध्ये ड्युअल सेन्सर कॅमेरा सेटअप, ड्युअल मायक्रोफोन आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. Dell XPS 13 9315 मध्ये 51WHr बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याला 80 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल, असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये Wi-Fi 6, Bluetooth v5.2 आणि USB Type-C पोर्ट आहे.

dell xps 13

Dell XPS 13 9315 ची किंमत

 256 GB स्टोरेज वेरिएंटसह 8 GB रॅम असलेल्या i5 प्रोसेसरची किंमत 1,12,480 रुपये आहे आणि 512 GB स्टोरेजसह 16 GB रॅमची किंमत 1,32,480 रुपये आहे. तसेच, i7 प्रोसेसरसह 16 GB रॅम सह 512 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,42,480 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप सिंगल स्काय ब्लू कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. 25 ऑगस्टपासून कंपनीच्या खास स्टोअरमधून लॅपटॉप खरेदी करता येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo