CES 2016: रेजरने लाँच केला ब्लेड स्टेल्थ गेमिंग अल्ट्राबुक

HIGHLIGHTS

रेझरने कोअर ग्राफिक्स कार्डचीसुद्धा घोषणा केली जे, ह्या अल्ट्राबुकशी कनेक्ट होते आणि त्यामुळे त्याचा ग्राफिक्स परफॉर्मन्स वाढतो.

CES 2016: रेजरने लाँच केला ब्लेड स्टेल्थ गेमिंग अल्ट्राबुक

रेझरने गेमर्ससाठी Blade Stealth अल्ट्राबुकची घोषणा केलीय. ह्या अल्ट्राबुकची किंमत डॉलर ९९९(जवळपास ६७,००० रुपये) पासून सुरु होऊन डॉलर १,५९९ (जवळपास १,०६,९०० रुपये) पर्यंत आहे. ह्या डिवाइसमध्ये १२.५ इंचाची स्क्रीन देण्यात आली असून 2.5Ghz इंटेल कोर i7 प्रोसेसर आणि 8GB चा रॅम देण्यात आला आहे. ह्याचा कीबोर्ड रेझर मल्टी-ह्यूड क्रोमा लायटिंगसह येतो.ह्यात ह्याच्या मूळ प्रकारात 128GB SSD आणि क्वाड HD स्क्रीन रिझोल्युशन 2560×1440 पिक्सेलसह देण्यात आली आहे. तर ह्याच्या उच्च श्रेणीच्या प्रकारात ४के डिस्प्ले आणि 512GB SSD देण्यात आली आहे. ह्या अल्ट्राबुकला २ युएसबी पोर्ट त्याचबरोबर थंडरबोल्ट युएसबी टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

 

रेझर ब्लेड स्टेल्थ हा 0.52 इंचेस बारीक आणि वजन २.७५ पाउंड्स म्हणजे १.२ किलो आहे. ह्या अल्ट्राबुकला इतका बारीकपणा आणण्यासाठी पॉवरफुल असे ग्राफिक्स कार्ड वापरण्यात आले आहे. ह्यात बेसिक टास्क आणि लाइट गेमिंगसाठी Intel HD 520 ग्राफिक्स देण्यात आले आहे. तसेच ह्यातील काही अडचणी येत असल्यास  बाहेरील डेस्कटॉप ग्राफिक्ससाठी रेझर कोर नावाचे डिवाइस देण्यात आले आहे. हा तुमच्या ब्लेड स्टेल्थशी कनेक्ट केल्यानंतर यूजरला आणखी ४ युएसबी पोर्ट मिळतात त्याचबरोबर ethernet port सुद्धा मिळतो. पण त्याच्या ग्राफिक्स कामगिरीबाबत काही विशेष सांगण्यात आले नाही. ह्या सेटअपमुळे यूजरला हवे तेव्हा त्याच्या ग्राफिक्स कार्ड अपडेट करता येते.

Shrey Pacheco

Shrey Pacheco

Writer, gamer, and hater of public transport. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo