M2 प्रोसेसरसह Apple MacBook Air (2022) चे प्री-बुकिंग ‘या’ दिवशीपासून होणार सुरू, जाणून घ्या फीचर्स

M2 प्रोसेसरसह Apple MacBook Air (2022) चे प्री-बुकिंग ‘या’ दिवशीपासून होणार सुरू, जाणून घ्या फीचर्स
HIGHLIGHTS

Apple MacBook Air (2022) 8 जुलैपासून प्री-ऑर्डर करता येणार

Apple MacBook Air (2022) विक्री 15 जुलैपासून सुरू होईल

नवीन MacBook मध्ये 2TB SSD स्टोरेज मिळेल

Apple ने अखेर Apple MacBook Air (2022) च्या विक्रीची घोषणा केली आहे. Apple MacBook Air (2022) 8 जुलैपासून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते आणि त्याची विक्री 15 जुलैपासून सुरू होईल, म्हणजेच प्री-बुक केलेल्या ग्राहकांसाठी 15 जुलैपासून डिलिव्हरी सुरू होईल. मॅकबुक एअर ऍपलच्या इन-हाउस चिपसेट M2 सह सादर करण्यात आले आहे. याशिवाय, Apple MacBook Air (2022) चार कलर ऑप्शन्समध्ये आणि स्लिम डिझाइनमध्ये सादर करण्यात आला आहे.

Apple MacBook Air (2022) मध्ये 13.6-इंच लांबीचा LCD डिस्प्ले आहे. याशिवाय, यात 1080 पिक्सल HD वेब कॅम आहे. नवीन मॅकबुकमध्ये चार स्पीकर आहेत. याशिवाय, यात आयफोनप्रमाणे MagSafe चार्जिंगचाही सपोर्ट आहे. नवीन मॅकबुकला जुन्या मॅकबुकपेक्षा 20 टक्के जास्त व्हॉल्यूम मिळेल, असा दावा केला जात आहे. मॅकबुक 8 जुलैपासून संध्याकाळी 5.30 वाजता प्री-ऑर्डर करता येईल. 

हे सुद्धा वाचा : BSNL युजर्सना मोठा झटका! कंपनीने गुपचूप 'या' दोन प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स केले कमी

MacBook Air (2022) किंमत

MacBook Air ची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये आहे. MacBook Air (2022) टाईप-सी पोर्ट ते MagSafe 3 केबल आणि बॉक्समध्ये USB-C पॉवर ऍडॉप्टरसह येईल. Apple MacBook Air (2022) मिडनाईट, सिल्व्हर, स्पेस ग्रे आणि स्टारलाईट कलर्समध्ये उपलब्ध असेल.

MacBook Air (2022) चे स्पेसिफिकेशन

Apple चा M2 चिपसेट MacBook Air (2022) मध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, यात 13.6-इंच लांबीचा लिक्विड रेटिना डिस्प्ले मिळेल. बेझल पूर्वीपेक्षा खूपच कमी होईल आणि बॉर्डर थीन मिळेल. डिस्प्लेची ब्राइटनेस पूर्वीपेक्षा 25% जास्त असेल. नवीन MacBook मध्ये 2TB SSD स्टोरेज मिळेल.

Apple MacBook Air (2022) सह 1080 पिक्सेल वेबकॅम उपलब्ध असेल. यात डॉल्बी ऍटमॉस सपोर्टसह चार स्पीकर असतील. कनेक्टिव्हिटीसाठी, नवीन MacBook मध्ये  दोन USB Type-C, चार थंडरबोल्ट पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक मिळेल.

लॅपटॉपसोबत मॅजिक कीबोर्ड आणि फोर्स टच ट्रॅकपॅडही उपलब्ध असतील. यात 67W USB Type-C ऍडॉप्टर  मिळेल. बॅटरीबाबत 18 तासांच्या बॅकअपचा दावा आहे. M2 चिपसेट आणि macOS Monterey MacBook Air (2022) सह उपलब्ध असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo