एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज

एसर ट्रॅवलमेट X349 लॅपटॉप लाँच, 8GB रॅमने सुसज्ज
HIGHLIGHTS

ह्यात 14 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1080x1920 पिक्सेल आहे. हा लॅपटॉप 6th जेन कोर प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.

लॅपटॉप निर्माता कंपनी एसरने बाजारात आपला नवीन लॅपटॉप ट्रॅवलमेट X349 लाँच केला आहे. ह्याला कंपनीने नवीन ट्रॅवलमेट सीरिजचा एक भाग बनवला आहे. हा लॅपटॉप ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्या लॅपटॉपची किंमत 649.99 डॉलरपासून सुरु आहे आणि हा युरोप आणि चीनमध्ये उपलब्ध होईल.

कंपनीनुसार, ट्रॅवलमेट X349 ला स्लीक अॅल्युमिनियम चेसीसह लाँच केले गेले आहे. ह्याची जाडी 18mm आहे. ह्याला त्या लोकांना समोर ठेवून बनवले गेले आहे, जे खूप प्रवास करतात. कंपनीचा दावा आहे की. ह्याची बॅटरी १० तासांचा बॅटरी बॅकअप देते. ह्यात इंटेल कोर CPU दिले गेले आहे.

ह्या लॅपटॉपमध्ये 14 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे आणि ह्याचे वजन 1.53किलो आहे. हा विंडोज 10 प्रो वर आधारित आहे. ह्यात 14 इंचाची पुर्ण HD IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. हा लॅपटॉप 6th जेन कोर प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे. ह्यात 8GB चे रॅम आणि 512GB चे स्टोरेजसुद्धा आहे.

हेदेखील वाचा – ३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स

ह्यात LED बॅकलिट कीबोर्डसुद्धा आहे. ह्यात एक HD (720 रिझोल्युशन) वेबकॅम दिला गेला आहे. हा लॅपटॉप USB टाइप -C पोर्टने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – केवळ २,९९९ रुपयात मिळतोय रिलायन्स 4G फोन आणि तेही ३ महिन्याच्या अनलिमिटेड डाटासह
हेदेखील वाचा
– तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड माहित करुन घेण्यासाठी वापरा हा MySpeed App

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo