HIGHLIGHTS
लवकरच नवीन टॅबलेट Xiaomi Pad 6 भारतात लाँच होणार
Xiaomi Pad 5 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे.
कंपनी ICICI बँक क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची झटपट सूट देत आहे.
Xiaomi लवकरच आपला नवीन टॅबलेट Xiaomi Pad 6 भारतात लाँच करणार आहे. हा टॅबलेट पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. दरम्यान, नवीन टॅबलेट लाँच होण्याआधीच कंपनीने जुना मॉडेल म्हणजे Xiaomi Pad 5 च्या किमतीत कपात केली आहे. हा टॅबलेट दोन व्हेरिएंटमध्ये येतो. जाणून घ्या नवे दर –
SurveyXiaomi Pad 5 च्या 128GB आणि 256GB ची किंमत 26,999 रुपये आणि रु 28,999 रुपये आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 128GB व्हेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, कंपनीने 256GB व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी केली आहे.
त्यानुसार, 28GB व्हेरिएंट 25,999 रुपयांना आणि 256GB व्हेरिएंट 28,499 रुपयांना खरेदी करता येईल. ऑफर्स म्हणून कंपनी ICICI बँक क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची इन्स्टंट सूट देत आहे.
Xiaomi Pad 5 मध्ये 11-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा 120Hz रिफ्रेश रेट आहे. हा Android टॅबलेट ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह येतो. या टॅबलेटमध्ये तुम्हाला 6GB रॅम मिळणार आहे. तसेच, यात 128GB आणि 256GB स्टोरेज मिळणार आहे.
फोटोग्राफीसाठी टॅबमध्ये 13MP मेन कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. Android टॅबलेट 8720mAh बॅटरीसह येतो, जो 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. टॅबलेटसह Xiaomi Smart Pen येणार आहे. त्याबरोबरच, हा टॅब कीबोर्ड डॉकला देखील सपोर्ट करतो.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile