Bigg Boss लव्हर्स ! 24 तास Bigg Boss Live बघायचे आहे ? तर करा फक्त ‘हे’ काम

HIGHLIGHTS

बिग बॉस 24 तास LIVE अनकट अनसीन कंटेंट बघा

VOOT चे सब्स्क्रिप्शन प्लॅन 299 रुपयांपासून सुरु

हे प्लॅन्स एका वर्षाच्या वैधतेसह येतात.

Bigg Boss लव्हर्स ! 24 तास Bigg Boss Live बघायचे आहे ? तर करा फक्त ‘हे’ काम

बिग बॉस हा भारताचा खूप पॉप्युलर रियालिटी शो आहे. सध्या या TVवर कलर्स हिंदी वाहिनीवर या शोचा 16 वा सिझन सुरु आहे. TV वर शोचा आनंद घेता येत नसेल, तर हा शो OTT प्लॅटफॉर्म VOOTवर देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही, तर बिग बॉसची क्रेझ बघता मागील काही सिझनपासून VOOT वर या शोचे 24 तास प्रक्षेपण देखील केले जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील या शोचे किंवा कलर्स वाहिनीवरील इतर मालिकांचे इ. चा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला या ऍपचे सब्स्क्रिप्शन घ्यावे लागेल. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Redmi चा जगातील सुपरफास्ट चार्जिंग फोन ! अवघ्या 9 मिनिटात होणार फुल चार्ज, मिळेल 200MP कॅमेरा 

Voot सिलेक्ट म्हणजे काय?

वूट सिलेक्ट ही सबस्क्रिप्शन सेवा आहे, जी वापरकर्त्यांना विविध भाषांमधील विविध सामग्री द्विगुणितपणे पाहण्याची परवानगी देते. Voot सिलेक्ट ही Voot ची सशुल्क आवृत्ती आहे, ज्यामध्ये तुम्हाला शो, चित्रपट आणि बरेच काही मिळते.

Mobile Voot सब्स्क्रिप्शन प्लॅन 

मोबाईल Voot सब्स्क्रिप्शन प्लॅनची किंमत 299 रुपये आहे. हा प्लॅन एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये चित्रपट, रियालिटी शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. तुम्ही जाहिरातमुक्त कंटेंट पाहण्यास सक्षम असाल. मात्र हा प्लॅन फक्त मोबाईल सब्स्क्रिप्शन प्लॅन आहे, हे लक्षात घ्या. 

Gold Voot सब्स्क्रिप्शन प्लॅन 

वुटचा हा सब्स्क्रिप्शन प्लॅनदेखील वर्षभराच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला  चित्रपट, ओरिजिनल शो, टीव्ही चॅनेल आणि थेट लाईव्ह गेम्समध्ये ऍक्सेस मिळेल. तुम्ही एकावेळी 2 स्क्रीनवर पाहू शकता. जाहिरातींचा यामध्ये समावेश आहे. या प्लॅनसह तुम्ही टीव्हीवरही  VOOT शोजचा आनंद घेऊ शकता. 

Platinum Voot सब्स्क्रिप्शन प्लॅन 

वुटचा हा सब्स्क्रिप्शन प्लॅनदेखील वर्षभराच्या वैधतेसह येतो. या प्लॅनची किंमत 599 रुपये आहे. यामध्ये देखील चित्रपट, ओरीजनल्स शो, टीव्ही चॅनेल आणि लाईव्ह गेम्सचा ऍक्सेस मिळेल. तुम्ही एका वेळी 4 स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला जाहिरातमुक्त कंटेंट बघायला मिळेल. तुम्ही टीव्हीवरही कंटेंटचा आनंद घेऊ शकता. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo