Upcoming OTT Releases: आगामी सिरीज आणि चित्रपटात मिळेल ऍक्शन, हॉररसह कॉमेडीचा तडका, पुढील आठवडा असेल मनोरंजनाने भरपूर 

 Upcoming OTT Releases: आगामी सिरीज आणि चित्रपटात मिळेल ऍक्शन, हॉररसह कॉमेडीचा तडका, पुढील आठवडा असेल मनोरंजनाने भरपूर 
HIGHLIGHTS

ZEE5 ने मनोज बाजपेयींच्या थ्रिलर चित्रपट सायलेन्सचा सिक्वेल घोषित केला.

काम चालू है' हा बॉलीवूड ड्रामा चित्रपट OTT वर लवकरच रिलीज होणार आहे.

The Asunta Case रेमन कॅम्पोस, जेम्मा आर अभिनीत आगामी गुन्हेगारी थ्रिलर लघु सिरीज आहे.

जर तुम्ही सिनेरसिक आहेत, तर खास तुमच्यासाठीच आम्ही हा रिपोर्ट तयार केला आहे. OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी लेटेस्ट कंटेंट शोधत आहात? तर इथे आम्ही तुमच्यासाठी अतिशय रोमांचक आणि मनोरंजक चित्रपट आणि सिरीजची यादी घेऊन आलो आहोत, जे येत्या काळात प्रदर्शित होत आहेत. आगामी चित्रपट आणि शोजमध्ये बायोग्राफी, गुन्हेगारी, थ्रिलर्सपासून ते कॉमेडीजपर्यंत विविध प्रकारच्या शैलींचा समावेश आहे. चला तर मग बघुयात यादी-

Silence 2

गेल्या आठवड्यात वृत्त होते की, ZEE5 ने मनोज बाजपेयींच्या थ्रिलर चित्रपट सायलेन्सचा सिक्वेल घोषित केला आहे. ‘सायलेन्स 2: द नाईट आऊल बार शूटआउट’ उत्कट ट्रेलर देखील रिलीज केला आहे. ट्रेलरमध्ये मुंबईतील एका बारमध्ये झालेल्या गोळीबाराची सुरुवात होते ज्यामुळे शहरात दहशत पसरते. जेव्हा एसीपी अविनाश वर्मा प्रकरणाचा ताबा घेतो आणि गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देतो तेव्हा त्याला काही गोंधळात टाकणारे संकेत मिळतात. चित्रपट 16 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.

Language and Genre: Hindi, Drama, Action, Thriller

Cast: Manoj Bajpayee, Prachi Desai, Sahil Vaid, Vaqar Shaikh and Parul Gulati

OTT Release Date: 16 April 2024

Where to Watch: ZEE5

Kaam Chalu Hai

‘काम चालू है’ हा बॉलीवूड ड्रामा चित्रपट OTT वर लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पलाश मुच्छाल करत आहेत. याआधी पलाशने राजपाल यादवसोबत अर्ध हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात अभिनेता राजपाल यादव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात राजपाल व्यतिरिक्त जिया मानेक आणि कुरंगी नागराज देखील सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट 19 एप्रिल रोजी ZEE5 वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Language and Genre: Hindi, Drama

Cast: Rajpal Yadav, jiya Manek, Kurungi Nagraj

OTT Release Date: 19 April 2024

Where to Watch: ZEE5

Rebel Moon – Part Two: The Scargiver

Rebel Moon – Part Two: The Scargiver हा एक अमेरिकन एपिक स्पेस ऑपेरा चित्रपट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन झॅक स्नायडर यांनी केले आहे. चित्रपटात सोफिया बुटेला, चार्ली हुनम, एड स्क्रिन हे कलाकार आहेत. चित्रपट 19 April 2024 ला Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

Language and Genre: English, Drama

Cast: Sofia Boutella, Charlie Hunnam, Ed Skrein

OTT Release Date: 19 April 2024

Where to Watch: Netflix

The Asunta Case

The Asunta Case रेमन कॅम्पोस, जेम्मा आर अभिनीत आगामी गुन्हेगारी थ्रिलर लघु सिरीज आहे. नीरा, जॉन डे ला कुएस्टा आणि डेव्हिड ओरिया अरिबास हे असुंता बस्टेरा यांच्या हत्येवर आधारित आहे. सिरींजमध्ये कँडेला पेना आणि ट्रिस्टन उल्लोआ आहेत. ही सिरीज Netflix वर 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Language and Genre: English, Drama

Cast: Candela Pena, Tristan Ulloa, Javier Gutierrez, Maria Leon.

OTT Release Date: 26 April 2024

Where to Watch: Prime Video

Goodbye Earth

गुडबाय अर्थ नवीन दक्षिण कोरियन ड्रामा सिरीज आहे. ही सिरीज Netflix वर 26 एप्रिल 2024 रोजी पदार्पण करणार आहे. या सिरीजमध्ये तुम्हाला संपूर्ण 12एपिसोड्स बघायला मिळणार आहेत. सिरीजमध्ये Sung-Woo Jeon, Kim Yoon-hye, Ahn Eun-Jin, Yu Ah-in इ. कोरियन कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Language and Genre: English, Korean, Drama

Cast: Sung-Woo Jeon, Kim Yoon-hye, Ahn Eun-Jin, Yu Ah-in

OTT Release Date: 26 April 2024

Where to Watch: Prime Video

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo