Samsung ने लाँच केले सर्वोत्तम टॅबलेट्स! पहिल्यांदाच टॅबमध्ये मिळतील जबरदस्त AI फीचर्स, पहा किंमत 

HIGHLIGHTS

Samsung ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Samsung Galaxy S10 FE सिरीज भारतात लाँच केली.

सिरीजअंतर्गत Samsung Galaxy S10 FE आणि Samsung Galaxy S10 FE+ हे दोन टॅबलेट सादर

Samsung ने पहिल्यांदाच Galaxy Tab S10 FE सिरीजमध्ये AI-पॉवर्ड फीचर्स सादर केली आहेत.

Samsung ने लाँच केले सर्वोत्तम टॅबलेट्स! पहिल्यांदाच टॅबमध्ये मिळतील जबरदस्त AI फीचर्स, पहा किंमत 

साऊथ कोरियाची प्रसिद्ध टेक दिग्गज Samsung ने दीर्घ प्रतीक्षेनंतर Samsung Galaxy S10 FE सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत, Samsung Galaxy S10 FE आणि Samsung Galaxy S10 FE+ हे दोन टॅबलेट लाँच करण्यात आले आहेत. या प्रीमियम टॅबलेटमध्ये अनेक आश्चर्यकारक AI फीचर्स देखील सादर करण्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Samsung Galaxy Tab S10 FE सिरीजची किंमत आणि सर्व फीचर्स-

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Airtel Plans 2025: एका महिन्याच्या वैधतेसह येणारे जबरदस्त प्लॅन्स, किंमत 500 रुपयांपेक्षा कमी

Samsung Galaxy Tab S10 FE आणि Samsung Galaxy Tab S10 FE+ ची किंमत

Samsung Galaxy Tab S10 FE सिरीजची सुरुवातीची किंमत 42,999 रुपये इतकी आहे. तर या टॅबच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 73,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. दुसरीकडे, Samsung Galaxy Tab S10 FE+ ची किंमत 55,999 रुपयांपासून सुरू होते. त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 61,999 रुपये इतकी आहे.

Samsung Galaxy Tab S10 FE आणि Samsung Galaxy Tab S10 FE+

डिस्प्ले

Samsung Galaxy Tab S10 FE+ मध्ये 13.1 इंच लांबीचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्टॅंडर्ड व्हेरिएंट 10.9-इंच लांबीचा LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. तर, दोन्ही मॉडेल्सच्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz इतका आहे. या टॅबच्या पॉवर बटनमध्ये एक फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

प्रोसेसर आणि स्टोरेज

Samsung ने दोन्ही टॅबलेटमध्ये Exynos 1580 चिपसेट दिली आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. ही स्टोरेज 2GB पर्यंत वाढवता येईल.

Samsung Galaxy Tab S10 FE आणि Samsung Galaxy Tab S10 FE+

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy Tab S10 FE आणि Samsung Galaxy Tab S10 FE+ या दोन्ही टॅब्लेटमध्ये 13MP चा मुख्य कॅमेरा आणि आकर्षक सेल्फीसाठी 12MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

बॅटरी

पॉवर बाकापसाठी, Samsung Galaxy Tab S10 FE+ मध्ये 10,090mAh बॅटरी आहे. तसेच, Galaxy Tab S10 FE मध्ये 8000mAh बॅटरी आहे. बॅटरी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हे टॅब्स IP68 रेटिंगसह येतात.

AI फीचर्स

Samsung ने पहिल्यांदाच Galaxy Tab S10 FE सिरीजमध्ये AI-पॉवर्ड फीचर्स सादर केली आहेत. सर्कल टू सर्च फीचर वापरकर्त्यांना अ‍ॅप्स स्विच न करता थेट स्क्रीनवरून माहिती शोधण्याची परवानगी देते. तसेच, सॅमसंग नोट्समध्ये आता क्विक कॅलक्युलेशनसाठी आणि नोट्स अधिक व्यवस्थित करण्यासाठी हॅन्डरायटींग हेल्प यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo