Samsung Fab Grab Fest : फोन, टॅबलेट सर्व उपकरणांवर मिळतील भारी डिल्स

HIGHLIGHTS

Samsung Fab Grab Fest जाहीर

स्मार्टफोन्स, टॅबलेटवर मिळेल प्रचंड सूट

HDFC आणि ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 14% पर्यंत सूट

Samsung Fab Grab Fest : फोन, टॅबलेट सर्व उपकरणांवर मिळतील भारी डिल्स

Samsung ने समर फेस्ट सेल Samsung Fab Grab Fest जाहीर केला आहे. या सेलमध्ये सॅमसंगचे इलेक्ट्रॉनिक्स आणि गॅलेक्सी स्मार्टफोन्स, टॅबलेट, लॅपटॉप, ऍक्सेसरीज आणि वेअरेबल्सच्या प्रोडक्ट्सवर ऑफर आणि कॅशबॅकचा लाभ घेऊ मिळणार आहे. फेस्ट ऑफर्स Samsung.com वर तसेच देशभरातील सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्सवर तुम्हाला बघता येतील.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

स्मार्टफोन्स, टॅबलेटवर प्रचंड सूट 

 सेलदरम्यान Galaxy S Series, A Series, M Series, F Series आणि Flip 3 स्मार्टफोन्सच्या निवडक मॉडेल्सवर 57% पर्यंत सूट मिळू शकते. तर, Galaxy टॅब्लेट, ऍक्सेसरीज आणि वेअरेबलवर 40% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच, ग्राहकांना HDFC आणि ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 14% पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देखील उपलब्ध असेल.

TV वर मिळेल 45% सूट 

सॅमसंग टीव्हीचे निवडक मॉडेल, म्हणजेच फ्लॅगशिप निओ QLED आणि द फ्रेम TV आणि क्रिस्टल यूएचडी सिरीज 45% पर्यंत सूटवर उपलब्ध असतील. 'फॅब ग्रॅब फेस्ट' 2023 मध्ये फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह, मॉनिटर्स आणि एअर कंडिशनर्स यांसारख्या अनेक डिजिटल उपकरणांवरही उत्तम ऑफर्स मिळणार आहेत. 

बँक ऑफर्स 

Samsung ऍक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणारे ग्राहक फॅब ग्रॅब फेस्ट ऑफर्सवर अतिरिक्त 10% कॅशबॅक देखील मिळणार आहेत. ग्राहकांना HDFC आणि ICICI बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 14% पर्यंत अतिरिक्त कॅशबॅक देखील उपलब्ध असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo