Ram Setu Teaser:अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज, बघा VIDEO

HIGHLIGHTS

अक्षय कुमारच्या 'राम सेतू' चित्रपटाचा टिझर रिलीज

टीझरमध्ये अक्षय कुमार पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसतोय

हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार

Ram Setu Teaser:अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज, बघा VIDEO

अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'राम सेतू'चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची लोक खूप दिवसांपासून वाट पाहत होते.पहिली झलक पाहिल्यानंतर चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजेच 25 सप्टेंबरला अक्षय कुमारने सोशल मीडियावर संकेत दिले होते की तो दुसऱ्या दिवशी एक मोठा अपडेट देणार आहे. या पोस्टमुळे अक्षय सोमवारी 'राम सेतू' संदर्भात मोठी घोषणा करू शकतो, असा अंदाज चाहत्यांनी आधीच बांधला होता.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Oppo दिवाळी सेल : 'या' स्मार्टफोन्सवर मिळतेय भरघोस सूट, त्यासोबतच तब्बल रु. 10 लाख जिंकण्याची संधी

चित्रपटाच्या टीझरमध्ये अक्षय कुमार पुरातत्वशास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये ते राम सेतू वाचवण्यासाठी फक्त तीन दिवस असल्याचे सांगत आहेत. या चित्रपटाची छोटीशी झलक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे. अनेक लोक या पोस्टवर फायर इमोजीही शेअर करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

तत्पूर्वी, अक्षयने सोमवारी रात्री 9:30 च्या सुमारास ट्विट करून 12 वाजता या चित्रपटाचे मोठे अपडेट दिले जाणार असल्याची माहिती दिली होती.अक्षयने लिहिले, "आमच्यासोबत सामील व्हा आणि या रोमांचक प्रवासाचा एक भाग व्हा… जगभरातील राम सेतूची पहिली झलक, आज दुपारी 12 वाजता. तुम्ही तयार आहात का?' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे." या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस, सत्यदेव कंचराना देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo