अलीकडेच शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा बद्दल बातमी आली होती की, तो Bigg Boss मध्ये सामील होऊ शकतो. काही काळापासून लाइमलाइट आणि सोशल मीडियापासून दूर असलेला राज आता सलमान खानच्या शो बिग बॉसच्या आगामी सीझनमध्ये दिसणार आहे. येथे राज त्याच्या आयुष्याविषयी अनेक खुलासे करणार असल्याची बातमी येत आहे. . एवढेच नाही तर या शोमध्ये स्पर्धक म्हणून दिसण्यासाठी राज चांगले पैसे घेत असल्याचीही बातमी समोर आली आहे. मात्र, याबाबत राजने अद्याप मौन बाळगले आहे.
एका रिपोर्टनुसार, शोबाबत राज आणि मेकर्समध्ये चर्चा सुरू आहे. राज यांनी संपूर्ण सीझनसाठी 30 कोटी मागितले आहेत, ही खूप मोठी रक्कम आहे. याशिवाय त्याला शोमध्ये दीर्घकाळ राहायचे आहे, अशीही राजची मागणी आहे. इतकंच नाही तर असंही म्हटलं जात आहे की, राज यांनी निर्मात्यांना त्यांची फी NGOला दान करण्यास सांगितली आहे. त्याला शोमधून स्वत:साठी एकही पैसा घ्यायचा नाही.
जर तसे असेल तर, यामुळे राजला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळेल. कारण पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून त्यांच्या प्रतिमेवर वाईट परिणाम झाल्याचे सर्वांनी बघितले आहे.
राजने शेअर केली पोस्ट
पॉर्न प्रकरणात तुरुंगातून बाहेर आलेल्या राजला 21 सप्टेंबरला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. 1 वर्षानंतर आता राज यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो फेस मास्क आणि डार्क सनग्लासेस घातलेला दिसत आहे. फोटोवर लिहीले आहे की, जर तुम्हाला संपूर्ण कथा माहित नसेल तर गप्प बसा. हा फोटो शेअर करण्यासोबतच राजने लिहिले की, "तुरुंगातून सुटून आज 1 वर्ष झाले आहे. ही बाब केवळ काळाची असून न्याय निश्चितच मिळेल. सत्य लवकरच बाहेर येईल. माझ्या शुभचिंतकांचे आभार आणि ट्रोल करणार्यांचे खूप खूप आभार ज्यांनी मला मजबूत केले. "
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile