शाओमीने लाँच केली एक इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल

शाओमीने लाँच केली एक इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल
HIGHLIGHTS

ह्या सायकलची किंमत ३०,७०० रुपये ठेवली आहे आणि ह्याचे वजन ७ किलोग्रॅम आहे.

तसे शाओमीला आपण एक स्मार्टफोन निर्माता कंपनी म्हणूनच ओळखतो. मात्र ही कंपनी इतरही अनेक प्रोडक्टस बनवते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे कंपनीने बाजारात आपली इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल Qicycle लाँच केली आहे. ह्याची किंमत CNY 2,999 (जवळपास ३०,७०० रुपये) ठेवली आहे. ह्या सायकलला कार्बन फायबरने बनवले गेले आहे आणि ह्याचे वजन केवळ ७ किलोग्रॅम आहे. ह्या सायकलला तुम्ही फोल्डही करु शकता. हे ह्याचे सर्वात खास आणि महत्त्वाचे आकर्षण आहे. ही कारच्या डिक्कीमध्ये अगदी सहजपणे फिट होते. ही सायरल 250W 36V इलेक्ट्रिक मोटरसह 18650 बॅटरीने सुसज्ज आहे. ही सायकल ४५ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. ह्यात एक बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसुद्धा आहे. ह्या सायकलमध्ये एक कंम्प्यूटरसुद्धा दिला आहे, जो यूजरला फिटनेसशी जोडतो. ही सायकल चीनशिवाय इतर देशांमध्ये कधीपर्यंत उपलब्ध होईल, ह्याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
 


 

खाजगी ट्रान्सपोर्ट साधन बनविण्याची शाओमीची ही काही पहिली वेळ नाही. ह्याआधी ऑक्टोबरमध्ये, कंपनीने Ninebot Mini लाँच केला होता. ही एक इलेक्ट्रिक सेल्फ-बॅलेंसिंग स्कूटर होती. ही स्कूटर 16km/hr ची गती पकडू शकते. ही सिंगल चार्जमध्ये २२ किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
 

 

हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo