प्रतीक्षा संपली ! उद्या 5G सेवा सुरू होणार; Jio, Airtel आणि Vi युजर्ससाठी खास रिपोर्ट

ने Reshma Zalke | वर प्रकाशित 30 Sep 2022
HIGHLIGHTS
  • अखेर 5G सेवा उद्या सुरू होणार आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 ऑक्टोबर 2022 रोजी इंडियन मोबाइल काँग्रेस 2022 मध्ये अधिकृतपणे 5G मोबाइल सेवा सुरू करतील.

  • 10 कोटींहून अधिक भारतीय अपग्रेडसाठी तयार आहेत.

प्रतीक्षा संपली ! उद्या 5G सेवा सुरू होणार; Jio, Airtel आणि Vi युजर्ससाठी खास रिपोर्ट
प्रतीक्षा संपली ! उद्या 5G सेवा सुरू होणार; Jio, Airtel आणि Vi युजर्ससाठी खास रिपोर्ट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 ऑक्टोबर 2022 रोजी इंडियन मोबाइल काँग्रेस 2022 मध्ये अधिकृतपणे 5G मोबाइल सेवा सुरू करतील. रिलायन्स JIO चे मुकेश अंबानी, AIRTEL चे सुनील मित्तल आणि VI चे कुमार मंगलम बिर्ला हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) च्या अधिकृत वेबसाइटवरून असे दिसून आले आहे की, PM मोदी वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन करतील, जे दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय आणि भारतीय सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन (COAI) यांनी संयुक्तपणे आयोजित केले आहे. अशा परिस्थितीत Jio, Airtel आणि Vi कडून काय अपेक्षा ठेवल्या जाऊ शकतात, ते बघुयात... 

हे सुद्धा वाचा : कमी किमतीत आणि 5000mAh बॅटरीसह Redmi Note 11R नवा स्मार्टफोन लाँच, वाचा डिटेल्स

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये, IMC ने लिहिले, "भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते "इंडिया मोबाइल काँग्रेस 2022" चे उद्घाटन घोषित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. 01 तर 04 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रगती मैदानावर आमच्यासोबत सामील व्हा."

10 कोटींहून अधिक भारतीय अपग्रेडसाठी तयार आहेत

एरिक्सनच्या अहवालानुसार, भारतात 5G-तयार स्मार्टफोन असलेले 100 दशलक्ष वापरकर्ते 2023 मध्ये 5G सबस्क्रिप्शनमध्ये अपग्रेड करू इच्छितात, तर त्यापैकी निम्म्याहून अधिक पुढील 12 महिन्यांत उच्च डेटा टियर प्लॅनमध्ये अपग्रेड करतील. शहरी केंद्रांमधील भारतीय स्मार्टफोन वापरकर्ते 5G वर अपग्रेड होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शहरी भारतात 5G वर अपग्रेड करण्याचा हेतू यूके आणि यूएस सारख्या बाजारपेठांपेक्षा दुप्पट आहे जिथे 5G सेवा उपलब्ध आहेत.

Jio या दिवाळीपर्यंत अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G आणणार 

रिलायन्स JIO या दिवाळी 2022 पर्यंत अनेक प्रमुख शहरांमध्ये Jio 5G आणण्याची योजना करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, "आम्ही Jio 5G फूटप्रिंट दर महिन्याला वाढवण्याची योजना आखत आहोत. डिसेंबर 2023 पर्यंत, आम्ही आमच्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक तहसीलमध्ये Jio 5G पोहोचवू."

AIRTEL देखील 5G ​​रोलआउट करण्यास तयार आहे

दरम्यान, भारती एअरटेल लिमिटेड आपली 5G सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहे आणि 2023 च्या अखेरीस शहरी भारताचा समावेश करेल. एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, "डिसेंबरपर्यंत प्रमुख महानगरांमध्ये कव्हरेज होणे अपेक्षित आहे. त्यानंतर, आम्ही देशभरात वेगाने विस्तार करू."

Reshma Zalke
Reshma Zalke

Email Email Reshma Zalke

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. Read More

Tags:
5g network in india whats is 5g technology 5g network speed
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

TRUE HUMAN Anti-Theft and USB charging port backpack with combination lock Laptop bag
TRUE HUMAN Anti-Theft and USB charging port backpack with combination lock Laptop bag
₹ 675 | $hotDeals->merchant_name
ARG HEALTH CARE Leg Massager for Pain Relief Foot, Calf and Leg Massage with Vibration and Heat Therapy (Golden)
ARG HEALTH CARE Leg Massager for Pain Relief Foot, Calf and Leg Massage with Vibration and Heat Therapy (Golden)
₹ 15499 | $hotDeals->merchant_name
AGARO CM2107 Sonic Facial Cleansing Massager, Ultra Hygienic Soft Silicone Facial Cleansing Brush for Deep Cleansing, Skin Care, Gentle Exfoliating and Heated Massaging Waterproof & Dustproof Vibrating Facial Brush, Purple

₹ 759 | $hotDeals->merchant_name
ah arctic hunter Anti-Theft 15.6 inches Water Resistant Laptop Bag/Backpack with USB Charging Port and for Men and Women (Black)
ah arctic hunter Anti-Theft 15.6 inches Water Resistant Laptop Bag/Backpack with USB Charging Port and for Men and Women (Black)
₹ 2699 | $hotDeals->merchant_name
Fur Jaden Anti Theft Backpack 15.6 Inch Laptop Bag with USB Charging Port and Water Resistant Fabric
Fur Jaden Anti Theft Backpack 15.6 Inch Laptop Bag with USB Charging Port and Water Resistant Fabric
₹ 799 | $hotDeals->merchant_name