Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » General » Paytm चे नवीन UPI ​​Statement Download फीचर रोलआऊट! जाणून घ्या कसे करेल काम? 

Paytm चे नवीन UPI ​​Statement Download फीचर रोलआऊट! जाणून घ्या कसे करेल काम? 

By Reshma Zalke | Updated on 07-Nov-2024
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

Paytm ने वापरकर्त्यांसाठी नवीन UPI ​​Statement Download फिचर सादर केले.

या फिचरद्वारे तुम्ही तुमच्या UPI पेमेंट खर्चाचा हिशोब सहज ठेऊ शकता.

नव्या फीचर अंतर्गत तुम्हाला कोणत्याही तारखेचे आणि आर्थिक वर्षाचे विवरण सहज मिळण्यास मदत होईल.

Paytm चे नवीन UPI ​​Statement Download फीचर रोलआऊट! जाणून घ्या कसे करेल काम? 
Reshma Zalke Reshma Zalke
07-Nov-2024

लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट ऍप Paytm ने आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन UPI ​​Statement Download फिचर सादर केले आहे. हे फिचर विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे, जे दिवसातून अनेकदा UPI पेमेंट करतात आणि पेमेंट्सचे हिशोब ठेऊ शकत नाही. असे अनेकदा होते की, आपण दिवसभरात अनेक लहान-मोठे UPI पेमेंट करतो, ज्यामुळे प्रत्येक पेमेंटचा हिशोब ठेवणे कठीण होते. आता Paytm ने आपल्या युजर्सच्या या समस्येवर निराकरण म्हणून नवे फिचर रोलआऊट केले आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: JioTV+ चे नवे AI Sensor फीचर लाँच! कुटुंबासोबत पाहताना ऍडल्ट सीन होणार ब्लर

UPI ​​Statement Download

Introducing the UPI Statement Download on Paytm! Now, track expenses and streamline tax filing with ease. Download statements by date range or financial year in a clear PDF format – designed for better expense management and simplified tax preparation.

Read more:… pic.twitter.com/EI0Yt2fqfb

— Paytm (@Paytm) November 6, 2024

Paytm ने आपल्या अधिकृत X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर हँडलद्वारे नवीन UPI ​​स्टेटमेंट डाउनलोड फिचरबद्दल माहिती दिली आहे. या फिचरद्वारे तुम्ही तुमच्या UPI पेमेंट खर्चाचा हिशोब सहज ठेऊ शकता. त्याबरोबरच, हे नवीन फीचर तुमच्यासाठी टॅक्स फाइलिंग दरम्यान खूप उपयुक्त ठरणार आहे, असे देखील कंपनीने सांगितले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे फिचर सध्या PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे.

Paytm UPI ​​Statement कसे डाउनलोड करावे?

  • सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोनमध्ये Paytm UPI ऍप ओपन करा.
  • यानंतर मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या ‘Balance and History’ सेक्शनमध्ये क्लिक करा.
  • आता तुम्हाला ‘पेमेंट हिस्ट्री’च्या सर्च बारच्या पुढे डाउनलोड पर्याय दिसेल.
paytm payments
Paytm Payments
  • डाउनलोड आयकॉनवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला डेट रेंज आणि Financial Year चे दोन सेक्शन्स दिसतील.
  • डेट रेंजमध्ये तुम्ही 1 महिना, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष आणि कस्टमाइज डेटद्वारे UPI स्टेटमेंट डाउनलोड करू शकता.
  • Financial Year सेक्शनअंतर्गत तुम्ही संपूर्ण वर्षाचे विवरण देखील सहज काढू शकता.

वर सांगितल्याप्रमाणे, UPI ​​Statement Download फिचर सध्या PDF फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हे नवे फिचर एक्सेल फॉरमॅटमध्येही सादर केले जाईल. या फीचर अंतर्गत तुम्हाला कोणत्याही तारखेचे आणि आर्थिक वर्षाचे विवरण सहज मिळण्यास मदत होईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo