पॅनेसोनिक टफपॅड FZ-A2 टॅबलेट लाँच, 10.1 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज

HIGHLIGHTS

पॅनेसोनिक टफपॅड FZ-A2 टॅबलेट डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे आणि हा IP65 प्रमाणित आहे.

पॅनेसोनिक टफपॅड FZ-A2 टॅबलेट लाँच, 10.1 इंचाच्या डिस्प्लेने सुसज्ज

पॅनेसोनिकने आपल्या नवीन टॅबलेट टफपॅड FZ-A2 ला लाँच केले आहे. ह्या टॅबलेटची किंमत 939 GBP (जवळपास ८९,४०० रुपये) आहे. हा टॅबलेट सध्यातरी युएसमध्ये लाँच केला आहे. आणि हा जुलै महिन्यात सेलसाठी उपलब्ध होईल.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्या टॅबलेटमध्ये 10.1 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1200 पिक्सेल आहे. हा डिवाइस 1.44GHz इंटेल अॅटम x5-Z8550 प्रोसेसर आणि 4GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात इंटेल HD ग्राफिक्स ४०० सुद्धा आहे. ह्या डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

हा टॅबलेट 8 मेगापिक्सेलच्या रियर कॅमे-याने सुसज्ज आहे. ह्या कॅमे-यासह LED फ्लॅशसुद्धा दिली आहे. हा टॅबलेट अॅनड्रॉईड 6.0 मार्शमॅलो ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ह्या टॅबलेटमध्ये 4G LTE, वायफाय, GPS, ब्लूटुथ, USB टाइप-C पोर्ट आणि एक HDMI पोर्ट दिला आहे. टॅबलेट डस्ट आणि वॉटर रेसिस्टंट आहे आणि हा IP 65 प्रमाणित आहे.

हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo