आजकाल प्रेक्षकांचे आकर्षण चित्रपटगृहांपेक्षा OTT प्लॅटफॉर्मकडे जास्त आहे. दर आठवड्याला OTT प्लॅटफॉर्मवर येणार्या नवीन चित्रपटांची आणि वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर काहीतरी खास पाहायला मिळेल. अशा परिस्थितीत या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या चित्रपट आणि सिरीजवर एक नजर टाकुयात…
Disney + Hotstar च्या लोकप्रिय वेब सीरिज 'स्टार वॉर्स द मँडलोरियन'चा नवीन सीझन 1 मार्च रोजी OTT वर हिंदी आणि इंग्रजीमध्ये रिलीज होणार आहे. पहिला आणि दुसरा सीझन यशस्वी झाल्यानंतर वेब सीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
ताज डिव्हाइड बाय ब्लड
OTT प्लॅटफॉर्म ZEE5 ची ओरिजनल वेब सिरीज 'ताज डिव्हाइड बाय ब्लड' देखील या आठवड्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. यात नसीरुद्दीन शाह, धर्मेंद्र आणि अदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेब सीरिजमध्ये नसीरुद्दीन शाह अकबरच्या भूमिकेत आहे, तर अदिती राव हैदरी अनारकलीच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर आशिम गुलाटी सलीमच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सिरीज 3 मार्च रोजी ZEE5 वर प्रदर्शित होणार आहे.
गुलमोहर
मनोज बाजपेयी यांची नवीन वेब सिरीज 'गुलमोहर' प्रेक्षकांना 3 मार्चपासून Disney + Hotstar या OTT प्लॅटफॉर्मवर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. यामध्ये कुटुंबातील प्रेम आणि संघर्षाची कथा पाहायला मिळणार आहे. याचे दिग्दर्शन राहुल चित्तेला यांनी केले आहे. यामध्ये मनोजसोबत शर्मिला टागोर, सिमरन, सूरज शर्मा आणि अमोल पालेकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile