दर आठवड्याला OTT प्लॅटफॉर्मवर येणार्या नवीन चित्रपटांची आणि वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. प्रत्येक वेळेप्रमाणे या आठवड्यातही प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्मवर काहीतरी खास पाहायला मिळेल. या आठवड्यात अनेक उत्तमोत्तम चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बघा यादी…
रणवीर सिंगचा विनोदी चित्रपट 'सर्कस' या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस' हा चित्रपट 17 फेब्रुवारीपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे. 'सर्कस' हा चित्रपट गेल्या वर्षी 25 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. मोठ्या पडद्यावर हा चित्रपट काही खास जादू दाखवू शकला नाही.
द नाईट मॅनेजर
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूर स्टारर ऍक्शन ड्रामा वेब सिरीज 'द नाईट मॅनेजर' या आठवड्यात प्रेक्षकांना OTT वर पाहण्यासाठी उपलब्ध असेल. ही वेब सिरीज 17 फेब्रुवारीला OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर स्ट्रीम होईल. या सिरीजमध्ये अनिल कपूरसोबत आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला आणि रवी बहल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मायनस वन
मायनस वन ही रोमँटिक वेब सिरीज त्याच्या नवीन चॅप्टरसह सज्ज झाली आहे. याचे दिग्दर्शन शुभम योगी यांनी केले असून सिद्धांत माथूर यांनी लिहिले आहे. ही वेब सिरीज प्रेक्षकांना 14 फेब्रुवारीपासून OTT प्लॅटफॉर्म लायन्सगेट प्लेवर पाहायला मिळेल.
कार्निवल रो
ऑरलँडो ब्लूम आणि कारा डेलेव्हिंगने स्टारर फॅन्टसी ड्रामा 'कार्निव्हल रो' OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर त्याचा दुसरा सीझन सुरू करेल. ही सिरीज मानवी सभ्यतेने जिंकलेल्या दूरच्या देशांतील थोर स्थलांतरितांनी वसलेल्या व्हिक्टोरियन कल्पनारम्य जगाचा संदर्भ देते. ही ड्रामा सिरीज 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile