OTT This Week : या आठवड्यात लव्ह आणि क्राइमचा डबल धमाका, हे चित्रपट-सिरीज OTT वर होणार रिलीज

HIGHLIGHTS

या आठवड्यात OTT वर पुढील चित्रपट आणि सिरीज रिलीज होणार

प्रेक्षकांना मिळेल क्राईम आणि लव्ह स्टोरीचा डबल धमाका

क्रिमिनल जस्टीस, दिल्ली क्राईम सारख्या सिरीजचा समावेश

OTT This Week : या आठवड्यात लव्ह आणि क्राइमचा डबल धमाका, हे चित्रपट-सिरीज OTT वर होणार रिलीज

OTT च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता निर्माते प्रेक्षकांसाठी सातत्याने विविध प्रकारचे कंटेंट सादर करत आहेत. वेब सीरिजची लोकप्रियता बघता त्यांचे अनेक सीझन प्रदर्शित करण्याचा ट्रेंडही वाढला आहे. अशा परिस्थितीत, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंटची भरभराट आहे. नवीन आठवड्याच्या सुरूवातीस, लोक OTTवर प्रदर्शित होणाऱ्या सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात. चला तर मग जाणून घेऊया या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट आणि सिरीजबद्दल… 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Jio चे सर्वोत्तम प्लॅन्स ! 150GB डेटा Amazon Prime Video, Netflix आणि Disney + Hotstar मोफत

महारानी 2

महारानी या राजकीय गुन्हेगारी नाटक सिरीजचा दुसरा सीझन या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. हुमा कुरेशी अभिनीत या सिरीजमध्ये प्रेक्षकांना केवळ राजकारणच नाही तर प्रचंड गुन्हेगारीही पाहायला मिळणार आहे. कांगडा टॉकीज निर्मित आणि रवींद्र गौतम दिग्दर्शित 'महारानी 2' 25 ऑगस्टपासून OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर स्ट्रीम होणार आहे.

दिल्ली क्राइम 2

दिल्ली बलात्कार प्रकरणावर आधारित दिल्ली क्राईम या क्राइम थ्रिलर सीरिजच्या पहिल्या सीझनला प्रचंड यश मिळाल्यानंतर निर्माते आता या आठवड्यात सिरीजचा दुसरा सीझन रिलीज करणार आहेत. शेफाली शाह स्टारर सिरीजच्या दुसऱ्या सीझनमध्ये, अभिनेत्री पुन्हा एकदा DCP वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत मृत्यूचे गूढ उकलताना दिसणार आहे. ही सिरीज 26 ऑगस्टला NETFLIX वर प्रदर्शित होणार आहे.

क्रिमिनल जस्टिस 3

पहिल्या दोन सीझनला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता निर्माते लवकरच तिसरा सीझन आणणार आहेत. पंकज त्रिपाठीच्या उत्कृष्ट अभिनयाने गाजलेली ही सिरीज पुन्हा एकदा सत्यावरून पडदा उचलताना दिसणार आहे. क्रिमिनल जस्टिसचा तिसरा भाग, लोकप्रिय DISNEY + HOTSTAR सिरीजपैकी एक, 26 ऑगस्टपासून HOTSTAR वर उपलब्ध होईल.

प्लीज फाइंड अटेच्ड 3

शौर्य सिंग आणि सान्या अग्रवाल यांची रोमँटिक लव्हस्टोरी पुन्हा एकदा परत आली आहे. पहिल्या दोन सीझनमध्ये लोकांचे मनोरंजन केल्यानंतर आता या आठवड्यात सिरीजचा तिसरा सीझन रिलीज होणार आहे. आपल्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना प्रभावित केल्यानंतर आता बरखा सिंग आणि आयुष मेहरा यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. ही सिरीज 24 ऑगस्टपासून Amazon Mini TV वर पाहता येणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo