फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात OTT वर वेब सिरीज आणि चित्रपटांची गर्दी असणार आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. हा आठवडा तुमच्यासाठी मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज घेऊन येणार आहे. या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर दाखल होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजची यादी बघुयात…
शीबा चड्ढा, नायब खान आणि हेनलीना प्रिंजेन क्लाग स्टारर हिंग्लिश चित्रपट राबिया आणि ऑलिव्हिया 24 फेब्रुवारी रोजी Disney + Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी आणि हिंदी (हिंग्लिश) मध्ये बनलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण कॅनडा, सौदी अरेबिया आणि भारताच्या काही भागात झाले आहे.
आऊटर बँक सीजन 3
मिस्ट्रीने भरलेली ही सिरीज खूपच रंजक आहे. यापूर्वीच रिलीज झालेल्या दोन सीझनने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आता तिसर्या सीझनबद्दल चांगलीच उत्सुकता आहे. 23 फेब्रुवारी रोजी Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
A Quite Place part 2
हॉरर चित्रपट प्रेमींसाठी, OTT नेहमी सरप्राईज आणते. ज्यांना अशा कथा आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याच्या पहिल्या भागाने आधीच खळबळ उडवून दिली आहे. हा चित्रपट 24 फेब्रुवारीला Netflix वर प्रदर्शित होणार आहे.
पॉटलक सीजन-2
Sony Liv वरील Potluck Season-2 ही वेब सिरीज 24 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. पहिल्या सीझनच्या दमदार यशानंतर आता निर्माते दुसरा सीझन घेऊन येत आहेत.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile