Important! घरबसल्या ऑनलाईन Aadhaar कार्ड मोफत अपडेट करण्याची पुन्हा संधी, सरकारने केली मुदतवाढ
Aadhaar कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख 14 जून 2024 होती.
नागरिकांना दिलासा सरकारने Aadhaar कार्ड मोफत अपडेटची अंतिम मुदत वाढवली.
UID धारकांना 14 सप्टेंबरपर्यंत त्यांचे आधार कार्ड मोफत अपडेट करता येईल.
घरबसल्या ऑनलाईन Aadhaar कार्ड मोफत अपडेट करण्याच्या योजनेला भारतीयांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. Aadhaar कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख आज म्हणजेच 14 जून 2024 होती. मात्र, नागरिकांना आणखी एकदा दिलासा सरकारने आधार कार्ड मोफत अपडेटची अंतिम मुदत वाढवली आहे. होय, या योजनेची मुदत आणखी वाढवण्यात आली आहे. बघुयात सविस्तर माहिती-
SurveyAlso Read: Google Pixel 8 वर मिळतोय थेट हजारो रुपयांचा Discount! फ्लॅगशिप फोनवर आतापर्यंतची Best ऑफर
मोफत Aadhaar कार्ड मोफत अपडेट करण्याची
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड तपशील विनामूल्य अपडेट करण्यासाठी अंतिम मुदतीसाठी आणखी एक विस्तार जाहीर केला आहे. UIDAI नुसार, UID धारकांना 14 सप्टेंबरपर्यंत त्यांचे आधार कार्ड अपडेट पूर्ण करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. MyAadhaar पोर्टलवर आधार कार्ड अपडेट मोफत करता येईल. मात्र, ऑफलाइन अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाईल.
#UIDAI extends free online document upload facility till 14th September 2024; to benefit millions of Aadhaar Number Holders. This free service is available only on the #myAadhaar portal. UIDAI has been encouraging people to keep documents updated in their #Aadhaar pic.twitter.com/JOs3wF3NQf
— Aadhaar (@UIDAI) June 14, 2024
आम्ही तुम्हाला सांगतो की, पूर्वी या योजनेसाठी 15 डिसेंबर 2023 ही अंतिम तारीख होती. मात्र, पुढे या योजनेची अंतिम मुदत वाढत गेली. होय, त्यानंतर 14 मार्च, नंतर 14 जून आणि आता 14 सप्टेंबरपर्यंत अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
ऑनलाईन Aadhaar कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया
- सर्वप्रथम UIDAI ची अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जावे.
- साईटवर लॉग इन केल्यानंतर नाव, लिंग, जन्मतारीख आणि पत्ता इ. तपशील प्रविष्ट करावे.
- यानंतर तुम्हाला Update Aadhaar online ऑप्शनवर टॅप करावे लागेल.
- आता Address ऑप्शन निवडा आणि ‘Proceed to update Aadhaar’ यावर टॅप करावे.

- तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर वन-टाइम पासवर्ड (OTP) मिळेल.
- पुढे, कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत, फिंगरप्रिंट, आयरिश स्कॅन आणि नवीनतम पत्त्याचे तपशील प्रविष्ट करा.
- यानंतर तुम्हाला ‘Submit’ बटणवर क्लिक करावे लागेल.
- अपडेट रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर 14 अंकी URN क्रमांक तयार केला जाईल.
वरील सोपी प्रक्रिया फॉलो करून तुम्ही मोफतमध्ये Aadhaar अपडेटची विनंती करू शकता. यासह तुम्हाला नवा अपडेटेड आधार कार्ड लवकरच मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile