USB इम्प्लिमेंटर्स फोरमने USB टाइप-C ऑथेंटिकेशन स्पेसिफिकेशनसंंबधी घोषणा केली आहे की, ह्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की, तुमच्या डिवाइसला लावलेला केबल तुमच्या डिवाईससाठी योग्य आहे की नाही.
USB इम्प्लिमेटर्स फोरम, जे केबल सुरक्षित आहे की नाही हे प्रमाणित करतात, त्यांनी एक नवीन घोषणा केली आहे, जी आपल्या डिवाइसला खराब USB टाइप-C ने होणारे नुकसान सांगेल. त्याचबरोबर ती केबल योग्य आहे की नाही हेही सांगेल. ही सुरक्षित पाऊल USB टाइप-C ऑथेंटिकेशन स्पेसिफिकेशनला लक्षात घेऊन टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर येथे काही सॉफ्टवेअर्सचे नियम आहेत, जे तुम्हाला तुमच्या डिवाइसला लावलेला केबल योग्य आहे की नुकसान करणारा आहे ते सांगेल.
USB टाइप-C ऑथेंटिकेशन स्पेसिफिकेशन आपल्या डिवाइसला मालवेयरपेक्षाही सुरक्षा देणारे आहेत. कंपनीने ह्यासाठी सर्व आवश्यक चरण पुर्ण केले आहेत आणि लवकरच ही सुविधा वापरण्यास सुरुवात केली जाईल.