‘या’ तारखेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये सिनेमागृहात पाहता येणार!

HIGHLIGHTS

16 सप्टेंबरला 'राष्ट्रीय चित्रपट दिन'

केवळ 75 रुपयांमध्ये तिकिटे मिळतील

ब्रह्मास्त्र' चित्रपट बघण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही

‘या’ तारखेला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट फक्त 75 रुपयांमध्ये सिनेमागृहात पाहता येणार!

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्हाला मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहायचा असेल तर किमान 200 ते 300 रुपये प्रति तिकिट खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कुटुंबासह सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहण्याचा विचार केला, तर तुम्हाला 800 ते 1200 रुपये खर्च करावे लागतील. 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

मात्र, या सर्व परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी फक्त 75 रुपये मोजावे लागणार आहेत. होय, मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने निर्णय घेतला आहे की देशभरातील सर्व सिनेमा हॉलमध्ये 16 सप्टेंबरला केवळ 75 रुपयांमध्ये तिकिटे मिळतील.

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी iQoo Z6 Lite 5G लवकरच होणार लाँच, जाणून घ्या सर्वकाही

कोरोना कालावधीनंतर प्रेक्षकांना आमंत्रण

MAI ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, 'राष्ट्रीय चित्रपट दिन' सर्व वयोगटातील प्रेक्षकांना चित्रपटाद्वारे एकत्र आणेल. चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याचा उत्सव आणि प्रेक्षकांचे आभार मानण्याचा हा एक प्रकार आहे. जे अद्याप आपल्या जवळच्या चित्रपटगृहात परतले नाहीत अशा सर्वांना चित्रपट पाहण्याचे आमंत्रण आहे. कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बराच काळ बंद होती. त्यामुळे थिएटर मालकांना मोठा मनस्ताप आणि नुकसान सहन करावा लागला.

'या' सिनेमागृहात लाभ घ्या 

 यूएस मध्ये 3 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त, तिकीटाची किंमत फक्त पर्यंत कमी करण्यात आली आहे. यूएस मधील तिकिटांची किंमत साधारणतः $9 असते. MAI ने 16 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त देशभरात 75 रुपयांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. PVR, INOX, Cinepolis, Carnival, Mirage and City Pride, Asian, Mukta A2, Movietime, Wave, M2K आणि Delight यासह देशभरात सुमारे 4,000 स्क्रीन्स आहेत. जिथे 16 सप्टेंबरला चित्रपटाची तिकिटे 75 रुपयांना विकली जाणार आहेत.

असोसिएशनने म्हटले आहे की, भारत हा देशांतर्गत चित्रपट उद्योग आहे. या वर्षीच्या हिट चित्रपटांमध्ये 'KGF Chapter 2', 'RRR', 'विक्रम' आणि 'भूल भुलैया 2' हे आहेत. हॉलिवूडच्या 'डॉक्टर स्ट्रेंज' आणि 'टॉप गन: मॅव्हरिक'नेही उत्तम यश मिळवले आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo