MWC 2024: जगातील सर्वात मोठा ‘टेक फेअर’ कधी होणार सुरु? Xiaomi, Nothing सारखे ब्रँड्स सादर करतील नवकल्पना

MWC 2024: जगातील सर्वात मोठा ‘टेक फेअर’ कधी होणार सुरु? Xiaomi, Nothing सारखे ब्रँड्स सादर करतील नवकल्पना
HIGHLIGHTS

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस MWC 2024 येत्या काही दिवसांत सुरू होणार

सर्वात मोठा टेक फेअर MWC 2024 26 फेब्रुवारीपासून सुरू होईल.

हा कार्यक्रम स्पेनमधील 'बार्सिलोना' येथील 'फिरा ग्रँड व्हाया' या ठिकाणी होणार

मोबाईल वर्ल्ड काँग्रेस MWC 2024 येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक फेअरमध्ये कंपन्या त्यांचे नवीन नवनवीन शोध सादर करतात. या इव्हेंटमध्ये Xiaomi, Nothing, Sony, HMD Global आणि इतर अनेक ब्रँड्स 2024 मध्ये लाँच होणाऱ्या डिव्हाइसेसचे प्रदर्शन करतील, अशी माहिती मिळाली आहे. MWC मध्ये दरवर्षी आश्चर्यकारक गोष्टी पाहिल्या जाऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला MWC 2024 इव्हेंटबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग यंदा MWC 2024 मध्ये काय विशेष मिळेल ते जाणून घेऊयात-

MWC 2024 ‘या’ दिवशी होणार सुरु

वर्षातील सर्वात मोठा टेक फेअर MWC 2024 26 फेब्रुवारीपासून सुरू होईल. हा इव्हेंट 29 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. हा कार्यक्रम स्पेनमधील ‘बार्सिलोना’ येथील ‘फिरा ग्रँड व्हाया’ येथे होणार आहे. नवीनतम नवकल्पना MWC मध्ये प्रदर्शित केले जातात. चला तर मग जाणून घेउयात Xiaomi, Sony आणि HMD सारख्या कंपन्या या इव्हेंटमध्ये काय सादर करतील.

Nothing

Nothing Phone 2a launch date confirmed
Nothing Phone 2a launch date confirmed

MWC 2024 मध्ये प्रसिद्ध टेक कंपन्या Nothing ची उपस्थिती देखील दिसेल. कंपनी आपला परवडणारा स्मार्टफोन इथे सादर करू शकते, अशी अपेक्षा आहे. त्याला Nothing Phone 2a असे म्हणतात, जो भारतासह काही निवडक बाजारपेठांमध्ये 5 मार्च रोजी दाखल होणार आहे.

Honor

MWC 2024 मध्ये Honor देखील येत आहे. . या कार्यक्रमात काय होणार याबाबत अधिकृत माहिती नाही. कंपनीने नुकताच आपला सर्वात पातळ फोल्डेबल स्मार्टफोन Honor Magic V2 सादर केला आहे. कंपनीने 25 फेब्रुवारी रोजी एक कार्यक्रम शेड्यूल केला आहे, ज्यामध्ये नवीन स्मार्टफोन्सच्या श्रेणीचे अनावरण केले जाईल.

Xiaomi

Xiaomi ने 25 फेब्रुवारीला आपला कार्यक्रम शेड्यूल केला आहे. कंपनी MWC वर लेटेस्ट Xiaomi 14 Ultra दाखवेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro हँडसेट जागतिक बाजारपेठेसाठी सादर केले जाऊ शकतात. Xiaomi ने असेही म्हटले आहे की ते MWC येथे स्मार्टवॉच, इयरबड्स आणि कार सारखे पुढील जनरेशनचे स्मार्ट डिव्हाइसेस सादर करतील.

Xiaomi set for MWC 2024: New car, tablet, smartwatch & more teased

OnePlus

OnePlus कदाचित यावर्षीच्या MWC इव्हेंटमध्ये कोणतेही स्मार्टफोन सादर करणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, ब्रँड OnePlus Watch 2 लाँच करू शकतो. हे कंपनीचे पहिले स्मार्टवॉच असेल, जे Google च्या OS वर चालेल.

HMD Global

HMD ग्लोबलने म्हटले आहे की, ते MWC 2024 मध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. हा कार्यक्रम 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात नोकिया ब्रँडेड स्मार्टफोन्सची नवीन रेंज दाखवली जाण्याची शक्यता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo