Koffee With Karan शो च्या नव्या सिझनचा टीझर रिलीज, Disney + Hotstar वर ‘या’ तारखेपासून होणार सुरु

HIGHLIGHTS

Koffee With Karan सिझन 7 चा टिझर रिलीज

7 जुलैपासून हा शो स्ट्रीम होणार

शो केवळ डिझनी + हॉटस्टारवर बघता येणार आहे.

Koffee With Karan शो च्या नव्या सिझनचा टीझर रिलीज, Disney + Hotstar वर ‘या’ तारखेपासून होणार सुरु

बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा चॅट शो 'Koffee With Karan' सीझन 7 गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सुरुवातीला, करण जोहरने शोबद्दल बराच सस्पेन्स ठेवला आणि सांगितले की तो यावेळी कॉफी विथ करण शो करणार नाही. नंतर त्याने सांगितले की, तो शो करणार आहे, पण टीव्हीवर करणार नाही. रविवारी त्याने एक टीझर रिलीज केला. या व्हिडिओमध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स दिसत आहेत. त्यात शाहरुख खान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, करीना कपूर, सैफ अली खान, प्रियांका चोप्रा आणि इतर कलाकार आहेत. हे सर्व शो च्या मागील सिझनमध्ये देखील आले होते. हा शो 7 जुलैपासून स्ट्रीम होणार आहे.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हे सुद्धा वाचा : Realme चा स्वस्त फोन आज लाँच होणार, मिळेल OnePlus 10R सारखे लुक आणि 5000mAh बॅटरी 

 हा सीझन पूर्वीपेक्षा मोठा आणि चांगला असेल, असे करणने चाहत्यांना वचन दिले आहे. "कॉफी विद करण सीजन 7 फिर से आ रहा है। इस  बार यह और भी बड़ा, बेहतर और खूबसूरत होगा। देखते रहिए।" असे करणने म्हटले आहे. टीझर रिलीज होताच टिझर इंस्टाग्रामवर शेअर करणने "अंदाज लावा कोण परत येणार? यावेळी अधिक हॉट चर्चा होणार. हॉटस्टार स्पेशल कॉफी विथ करण सीझन 7 फक्त  Disney + Hotstar वर 7 जुलैपासून सुरु होणार आहे." अशाप्रकारचे कॅप्शन पोस्टला दिले आहे. 

 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

गेल्या मे महिन्यात करण जोहरने शोच्या सेटवरील फोटो शेअर केले होते. या सीझनमध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा दिसणार आहेत. त्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. दोघेही करण जोहरच्या जुग जुग जिओ या चित्रपटातील नच पंजाबन या गाण्यावर कॉफी विथ करणच्या सेटवर नाचत होते.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo