भारतात OTT प्लॅटफॉर्म्सचे क्रेझ वाढतच चालले आहे. त्यातच आता JioCinema नवे OTT प्लॅटफॉर्म देखील इतर प्लॅटफॉर्म्सना स्प्स्पर्धा देण्यासाठी सज्ज झाले आहे. बरेच लोक टीव्हीवर OTT पाहण्यास प्राधान्य देतात. येथे तुम्हाला मनोरंजनासाठी भरपूर कंटेंट मिळतो. यावर तुम्ही विशेष शो, चित्रपट, इ. देखील बघू शकता. आज आम्ही तुम्हाला JioCinema सह Disney+ Hotstar बाबत सविस्तर माहिती देणार आहोत. त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की, कोणता प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे.
JioCinema च्या ग्राहकांना 999 रुपयांचा प्लॅन ऑफर करतो. JioCinema वरील प्रीमियम कंटेंट जाहिरातींशिवाय अखंडितपणे बघता येईल. तसेच, अनेक जबरदस्त शो आणि नवीन रिलीज देखील तुम्हाला येथे मिळणार आहेत.
Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शन प्लॅन
Disney + Hotstar प्रीमियम मंथली 299 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये, तुम्ही जाहिरातींशिवाय चित्रपट, टीव्ही शो आणि लाईव्ह गेम्स पाहू शकता. Disney+ Hotstar 899 रुपयांचा प्लॅन वार्षिक वैधतेसह येतो. यामध्ये देखील तुम्हाला जबरदस्त शोज बघायला मिळणार आहेत. या प्लॅनसह तुम्ही दोन डिवाईसेस वर कंटेंट स्ट्रीम करू शकता.
याव्यतिरिक्त, तुम्ही Hotstar चा प्रीमियम वार्षिक प्लॅन देखील घेऊ शकता. हा प्लॅन 1,499 रुपयांचा आहे आणि यामध्ये तुम्हाला 4 वेगवेगळ्या डिव्हाइसेस वर स्ट्रीम करता येईल.
Disney+ Hotstar कडे टेलिव्हिजन कंटेंटची एक मोठी लायब्ररी आहे. तर, JioCinema आता थेट FIFA 2022 आणि IPL 2022 स्ट्रीमिंग सारख्या क्रीडा कंटेंट मोफत स्ट्रीम ऑफर करत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile